जळगाव प्रतिनिधी @गणेश पांढरे
जामनेर तालुक्यातील पहुर पोलिस ठाण्यात तोंडापूर येथील विजय शांताराम गवळी दिनांक 12-6-2020 रोजी रात्री ०8 : 3० चे सुमारास मांडवा खुर्द या गावाच्या जवळ 3 अनोळखी इसम यांनी विजय गवळी यांच्या गाडीला धक्का मारून खाली पाडून त्यांना मारहाण करीत त्यांच्या जवळील रोख रक्कम 8०8० रुपये व मोबाइल असा एकूण 14 हजार रुपये चा माल जबरी चोरून तेथून पळून गेले.विजय गवळी यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल करीत सदर गुन्ह्याची माहिती माननीय पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक गोरे साहेब व उपविभागीय पोलिस अधिकारी कातकाडे साहेब यांना देण्यात आली.सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचना व मार्गदर्शन प्रमाणे आरोपी यांचा शोध घेणे करिता पहूर पोलिस घटनास्थळी रवाना होऊन आरोपींविरुद्ध प्राथमिक माहिती प्राप्त करण्यात आली.
या दरोड्यात अज्ञात आरोपी हे जवळपासच्या गावाचे असावे असा अंदाज काढून घटनास्थळाचे जवळपासच्या पाच ते सहा गावावर लक्ष केंद्रित करून एक अधिकारी व तीन कर्मचारी अशी टीम आरोपी यांच्या शोधा करिता पाठवली असता काही गुप्त माहिती द्वारे गुन्ह्यातील गाडीचा नंबर प्राप्त करून 2 आरोपी यांना वाकडी येथून ताब्यात घेण्यात आले.सदर ताब्यातील आरोपी यांना पोलिसी खाख्या दाखवत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी या दरोड्यात अजून तीन साथीदार असल्याचे निष्पन्न करून एकूण पाच आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपी यांच्या कडून गुन्ह्यात वापरलेल्या 2 गाड्या व चोरलेला मुद्देमाल गुन्ह्याचे कामी जप्त करण्यात आले आहे.सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोलीस हवालदार शशिकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर ठाकरे यांनी अथक मेहनत घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणला आहे.

