Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पंढरपूर नागरिक आणि प्रशासन यंत्रणा यांच्या अथक प्रयत्न

Responsive Ad Here
अतुल वाघमारे@प्रतिनिधी पंढरपूर

पंढरपूर दि. ३०  नागरिक आणि प्रशासन यंत्रणा यांच्या अथक प्रयत्नामुळे कोरोनापासून दूर राहिलेल्या पंढरीला आज सकाळी सकाळीच तीव्र  धक्का  बसला असून सात जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. उर्वरित अहवालात अजून तरी उपलब्ध झाले नाहीत. उर्वरित अहवालात आणखी किती पॉजिटीव्ह रुग्ण असतील याचीही मोठी धास्ती आहे. शासन आणि प्रशासन सातत्याने काळजी घेण्याचे आवाहन करीत असताना काही बेजबाबदार लोकामुळे  पंढरीचे आरोग्य धोक्यात येत  असल्याचेच स्पष्ट दिसू लागले आहे. दोन दिवसापूर्वीच सापडलेला अत्यंत बेफिकीर असलेला  कोरोना शिक्षक  पंढरपुरकरांना  वेठीला धरायला लावणार हे संकेत आधीपासूनच मिळत होते आणि त्याच्या बेजबाबदार पणामुळे आज आलेल्या अहवालामुळे धक्का  अखेर बसला.  आजपर्यंत पंढरपुरमध्ये आढळलेले रुग्ण हे



 परगावावरून आलेले होते परंतु आता आढळत असलेले रुग्ण हे स्थानिक आहेत त्यामुळे अधिक काळजी व भीती वाढलेली आहे. आज आलेल्या अहवालात वाहन चालकासह  बँकेच्या दोन संचालकांचाही सहभाग आहे. एका राजकीय पक्षाचा शहराध्यक्ष, व्यापारी, वाहनचालक अशांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. संपर्कातील ५ जण तर अन्य २ असे हे सात रुग्ण आहेत. संपर्कातील रुग्णांपैकी एक बँक कर्मचारी तर एक वकील असल्याचीही चर्चा आहे. शिक्षक असलेल्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यापासून पंढरी  चिंतेत होती. या रुग्णाची तपासणी डॉक्टर असलेल्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी केली होती त्यामुळे एक नवीच काळजी निर्माण झाली होती. तथापि त्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आणि दिलासा मिळाला. शिक्षकाच्या संपर्कात आलेल्यांचे सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या प्रकरणातील भयानकता समोर येणार आहे परंतु आता पंढरीच्या नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आषाढी यात्रेच्या कालखंडातच पंढरीला हा दणका बसला आहे. प्रशासन प्रचंड परिश्रम घेत असताना काही बेफीकीर नागरिकांमुळे पंढरीचे आरोग्य अडचणीत येताना दिसत आहे.