सतीश पैठणे @चिखली प्रतिनिधि
बुलडाणा(चिखली):- महाराष्टभर आंबेडकरी अनुयायांवर अन्याय अत्याचार हौत आहे या संदर्भात मा. अध्यक्ष अनुसुचीत जाती जमाती आयोग नवी दिल्ली यांना मा. तहसिलदार चीखली यांच्या मार्फत नीवेदन देण्यात आले आहे. तसेच जून अनेक केसेस रजिस्टर झाल्या नाहीत, त्या लोकांसमोर येऊ दिल्या नाहीत. यासर्व अन्यायग्रस्तांना न्याय देण्यात यावा राज्यात होणारे अन्याय अत्याचार थांबविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा चिखली येथील आंबेडकरी चळवळीच्या सर्वपक्षीय पदाधिकारी
कार्यत्यांनी एकत्र येऊन निवेदन दिले यावेळी काॅग्रेसचे किशोर कदम, दलीत मुक्ती सेना चे भाई विजय गवई, प्रा.डाॅ. राजु गवई, बसपाचे प्रशांत डोंगरदिवे, रीपाई आठवले गटाचे भाई संजय वाकोडे, पत्रकार प्रताप मोरे,वंचीतचे विनोद कळसकर, पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष सतीश पैठणे प्रदिप खंडारे, रासपचे भरत जोगदंडे, बसपाचे समाधान ताजने, सामाजीक कार्यकर्ते राजेंद्र सुरडकर, भाजपाचे विजय खरे, स्वारीपचे सिध्दार्थ पैठणे, सामाजिक कार्यकर्ते विलास जावळे, प्रकाश बनकर, प्रकाश इंगळे, नितीन इंगळे यांच्या सहया आहेत.

