जळगाव प्रतिनिधी@ गणेश पांढरे
जामनेर तालुक्यातील पहुर-पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन पहुर पोलिस ठाणे हद्दीतील पहुर व भारुडखेडा येथे गावठी दारू विकणार्यांवर धाड टाकून गुन्हे दाखल करण्यात आले. आज दिवसभरात अवैध धंद्या विरोधात पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी त्यांच्या सहकाऱ्यांनी सट्टा पत्ता दारू अड्ड्यांवर स्वतः जाऊन अवैध धंदे करणाऱ्यांचे सळो की पळो केले तसेच आज दुपारी३वाजेनंतर पहुर येथील बसस्थानक परिसरात वाघुर पुला खाली गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिस उपनिरीक्षक संदिप चेंडे,सहा फौजदार अनिल अहिरे, पो.काँ. अनिल राठोड यांना पहुर येथील सलमान याकुब पठाण हा प्लास्टिक च्या पाउच मध्ये दारू विक्री करत असल्याचे दिसून आला पोलिसांना पहाताच सलमान ने पळ काढला. त्या ठिकाणी पोलिसांनी२०१०रूपये किमतीची १५लिटर गावठी दारूचे पाउच जप्त केले. तसेच पहुर पोलिस ठाणे हद्दीतील भारुडखेडा येथे संजय हिरा गोसावी हा त्याच्या घराच्या मागे गावठी दारू ची भट्टी लावतो या माहितीवरुन त्याठिकाणी पोहेकाँ भरत लिंगायत व पोकाँ.ज्ञानेश्वर नथ्थु बाविस्कर यांनी धाड टाकली असता पोलिसांना बघताच संजय गोसावी पळून गेला. त्या ठिकाणीं १५००रुपये किमतीचे ३००लिटर कच्चे रसायन मिळून आले. दोन्ही आरोपी विरुद्ध पहुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
