काशिनाथ शिंदे @प्रतिनिधी जामनेर
जामनेर शहरातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक ०९/०६/२०२० रोजी झालेल्या सर्व व्यापारी संघटना,सर्व राजकीय पक्ष तसेच तालुका प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार दिनांक ११/०६/२०२० वार गुरुवार ते १८/०६/२०२० वार गुरुवार जामनेर शहरातील आस्थापना (व्यवसाय) पुढील प्रमाणे सुरु राहील व अन्य सर्व आस्थापना (व्यवसाय) बंद राहतील
व्यवसायचा प्रकार
डेअरी - वेळ सकाळी ७ ते सकाळी ९ पर्यत व संध्या. ६ ते रात्री ८.०० वाजे पर्यंत
मेडीकल - २४ तास सुरु
बि-बियाणे, खत व फक्त ठिबक नळ्यांचे दुकाने - सकाळी ९.०० ते संध्या. ५.००
भाजीपाला व फळे - फक्त कॉलनी भागात विक्री करतील रस्त्यावर, मुख्य चौकात कोणीही दुकान लावणार नाही
सकाळी ९.०० ते संध्या. ५.००
उपरोक्त व्यवसाय सोडून सर्व व्यवसाय बंद राहतील (जसे कापड, किराणा, ज्वेलर्स, हॉटेल, नाश्ता, हार्डवेअर, मोबाईल, सौदर्य प्रसाधने, स्टेशनरी, कटलरी, बिअरशॉप, बिअरबार, सलन, पानटपऱ्या, चहाची दुकाने इत्यादी बंद राहतील) तरी सर्व नागरीकांनी व व्यापाऱ्यांना सदरचा बंद पाळावा.
