शारदा चव्हाण @ प्रतिनिधी चीप ब्युरो महाराष्ट्र
आज 25-6-2020.औरंगाबाद येथे कोरोना च्या 138 ची वाढ झाली असून 206 चा मृत्यू व 1642 चा दवाखान्यात ईलाज चालू आहे.वाढत्या कॉरोनाच्या पार्श्वभूमीवर काल औरंगाबाद च्या विविध पार्टी च्या आमदार,खासदार यांनी गेस्ट हाऊस मध्ये मीटिंग घेतली.वाढत्या कॉरोनाचा प्रकोप कसा रोखता येईल,यावर चर्चा करून त्यावर उपाय म्हणून 25-6-2020 रोजी प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्यांची मीटिंग करून विचार विमर्श करण्याचे ठरले आहे.
![]() |
| Add caption |
औरंगाबाद येथील विविध वॉर्ड मध्ये जाऊन कोरोनाची खरी स्थिती जणू घेण्याचे ठरवले आहे.कुंडलिक नगर,भांदासनगर,हनुमान नगर,जयभवानी नगर,विष्णू नगर,जयभीम नगर,बैजीपुरा,ई त्यादी एरिया मध्ये जाऊन परिस्थितीचा अंदाज घेणार आहेत. तसेच काँटोन्मेंट झोन मध्ये पण काय परिस्थिती आहे,कसे त्या भागाला कॉरोनामुक्त करता येईल याचा अंदाज घेणार आहेत. पोलीस कमिशनर,डॉक्टर्स,घाटी चे पदाधिकारी,जिल्हाधकारी,आणि इतर प्रशासनिक अधिकार्यासोबत आजची मीटिंग हि औरंगाबाद जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी महत्वपूर्ण असून सर्वांची कोरोनाविषयक चिंतामुक्तीचे कारण बनणार आहे.

