Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जातीयवादी हिंसाचाराचे नाहक बळी ठरवलेल्या बौध्द तरुणांवरील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी ग्रामीण युवा संघटना पातुर तालुका

Responsive Ad Here
मुकेश हातोले@प्रतिनिधी पातुर तालुका 

मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आंबेडकरी समूहावर जातीय मानसिकतेतून कोरोणा सारख्या रोगराईच्या लॉकडाऊन च्या काळात रोज हल्ले होत आहेत. ते खालील प्रमाणे झाले.
१) नागपूर येथील उच्चशिक्षित सामाजिक, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अरविंद बनसोड (३२) (रा. पिंपळधरा, तालुका. नरखेड) या होतकरु युवकाचा मृत्यू संशयास्पद मृत्यू झाला गॅस आफीसच्या बॅनवरील फोन नंबर चा फोटो काढला म्हणून गॅस आफीसचा संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस चा पदाधिकारी मिथिलेश उमरकर ने जबर मारहाण केली व त्याला आत्महत्येच स्वरुप देण्याचा प्रयत्न केला.
२) पिंपळे सौदागर येथील विराज जगताप या २० वर्षीय तरुणीची उच्चवर्णीय मुलीशी प्रेम केलं म्हणून तीच्या नातेवाईकांनी सशस्त्र हल्ला करून विराज जगताप हत्या करण्यात आली.
३) साळापुरी तालुका परभणी येथील रात्रीचा बौद्ध तरुणांवरील जीवघेणा हल्ला. वर्षभरापूर्वी निळा झेंडा लावला म्हणून वाद सुरू झाला त्याचा राग म्हणून रात्री कट रचून बौद्ध तरुणांना बोलावून अंधारात हल्ला केला, बौद्ध तरुणांन रक्तबंबाळ होऊन जीव मूठीत घेऊन पळाले.



१) वरिल प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी
२) वरिल प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे.
३) आरोपींवर अॅक्ट्रोसिटी अॅक्ट दाखल करावा.
४) पिडीत कुटुंबांना पोलिस संरक्षण देण्यात यावे.
तसेच आंबेडकरी समुहावरील हल्ले व अत्याचार रोखण्यासाठी ठोस भुमिका घेण्यात यावी. अन्यथा आंबेडकरी समूहाच्या आंदोलनाला शासनाने सामोरे जावे. असा इशारा ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.सतीश देवराव हातोले यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामीण युवा संघटना पातुर तालुका अध्यक्ष मा.उमेश राजाभाऊ गवई यांच्या नेतृत्वाखाली व कृष्णा ठाकरे,मा.रवी डोलारे, विशाल गवई व इतर कार्यकर्त्यां मार्फत शासनाला निवेदनाद्वारे देण्यात येत आहे.