Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दिलदार मित्र अजात शत्रू अशा पक्षातील मार्गदर्शक नेताला मुकलो - आमदार गिरीश महाजन

Responsive Ad Here
गणेश पांढरे@ प्रतिनिधी जळगाव

जळगाव - जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणारे माजी राज्यमंत्री तथा जिल्हाध्यक्ष हरी भाऊ जावळे यांच्या दुःख निधनाची बातमी माहीत झाल्यावर धक्का बसला आहे, माझे परिवारिक संबंध त्यांच्याशी होते, शेती आणि माती करिता धडपडणारा नेता म्हणून त्याची जिल्ह्यात ओळख होती. दुख:दायक आमचे नेते, स्व. हरिभाऊ जावळे यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान आज अचानक निधन झाल्याने भारतीय जनता पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मनाला चटका लावणारी ही घटना आहे. अतिशय प्रेमळ स्वभावाचे, सालस व्यक्तिमत्वाचे हरिभाऊ सोडून गेले यावर विश्वासच बसत नाहीये.हरिभाऊंनी रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार तथा रावेर लोकसभेचे दोन वेळा खासदार म्हणून ते लोकप्रिय होते, केंद्रीय पातळीवर पक्षाची सत्ता नसताना त्यांनी अनेक विकास कामे जिल्ह्यात खेचून आणले होते त्यांच्या कार्याची 


दखल सर्वतोपरी घेतली जाईल , आम्ही आमच्या जेष्ठ नेत्याला गमावल्याचे दुःख आहे. संघटन कौशल्य असल्याने स्मितभाषी स्वभाव म्हणून सध्या त्यांच्याकडे भाजपाच्या जळगाव ग्रा. जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. हरिभाऊंनी कायम पक्षाचा आदेश शिरसवांद्य मानून वाटचाल केली, जिल्ह्यात भाजपाचे संघटन वाढविण्यात भाऊंचा मोठा हात होता.जिल्ह्यातील केळी बागाईतदारांसाठी हरिभाऊ कायम झटले, केळीला फळाचा दर्जा मिळवून देण्यात हरिभाऊंचे मोठे योगदान होते.स्व. हरिभाऊ जावळेंची कमी आम्हांस सदैव जाणवेल संघ संसारातील नेता म्हणून ते नेहमी आठवणी राहतील.