विनोद कोते @ सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथिल जय कालिंका देवी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था १९७८ सालची औरंगाबाद सहधर्म आयुक्त येथे स्थापण आहे.परंतु २००३ साली या संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणराव कोलते हे वारले ,त्याताच फायदा घेऊन त्यांचा मुलगा भावराव लक्ष्मण कोलते याने ही संस्था जालन्या जिल्ह्यात दाखवून संस्थेचे बोगस रजिस्टेशन केले.व स्वता स्वयघोषीत अध्यक्ष दाखविले.तसेच मुख्याध्यापक म्हणून कार्यरथ आसलेले नारायन रायभान कोलते हे देखिल त्या वेळेसच्या अध्यक्षाचे पुतणे असल्यामुळे व प्रशिक्षित नसतांनाही मुख्याध्यापक पदावर रुजु करण्यात आले.तसेच या मुख्याध्यापकाने १७नं चे ५०फाँर्म १२वीच्या
विद्यार्थ्यांचे माध्यमिक शिक्षण बोर्ड औरंगाबाद येथे स्व जिल्हातील न भरता बाहेरील जिल्ह्यातील भरले.व त्या विद्यार्थ्यांना सावळदबारा येथिल रहवासी दाखवुन त्याच्या एल.सी वर पाठीमागुन स्वतः सह्या केल्या परंतु हे उघडकीस आल्यावर बोर्डाने ते फाँर्म रद्द केले.यांचाच भाऊ भास्कर लक्ष्मणराव कोलते हा १९९३ला याच संस्थेवर शिक्षक म्हणून काम करत होता,त्याच काळात १९९२-९३ला हा व्यक्ती औरंगाबाद येथिल वोखार्ड कंपनीत कामाला होता याने दोन्हिकडील शासणाचे पगार उचचले.आणि त्याच कालावधित बि.एड.ला संस्थेमार्फत ट्रेनिंगसाठी गेलेला होता .एक व्यक्ती तिन ठिकाणी कार्यरत दाखवण्याचा प्रताप अध्यक्ष ,मुख्याध्यापक याःनी केला याबाबत संस्थेमार्फत विनोद सुभाष कोते यांनी पोलीसांना तक्रार दिली परंतु काहिहि कारवाई झाली नाही.म्हणुन २०१५ला मा.दिवानी न्यायालयात हा खटला चालला व मा.न्यायालयाने कलम ४२०,४०९,४६५,४६८,१६६ १६७ ,३४प्रमाणे इशु प्रोसेससाठी पोलींसाना गुन्हा दाखल करण्यास सांगितले व तपास करून कागदपञे हस्तगत करण्यास सांगितले परंतु तपास अधिकार्याने तपास पुर्ण दाखवुन कोणतेही कागदपञ हस्तगत न करता तपास ब फाइनल केला.परंतु विनोद कोते यांनी न्याय मिळवण्यासाठी व शासनाची,संस्थेची लुट थांबण्यासाठी परत मा.न्यायालयात धाव घेतली व वरिल सर्व प्रकरणाचे सबळ पुरावे मा.न्यायालयात सादर केले .मा.न्यायालयाने सर्व कागदपञे तपासुन पोलिस निरीक्षक यांनी केलेली ब फाइनल रद्द करुन परत कलम ४२०,४०९,४६५,४६८,१६६,१६७,३४नुसार गुन्हे करण्याचे आदेश पारीत केले हा आदेश दि. २४/०६/२०२०ला पारीत झाला या केसमध्ये अँड.सचिन गिरी यांनी काम पाहिले.
