Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर तालुका राष्ट्रवादी तर्फे कोरोना योध्यांचा सन्मान

Responsive Ad Here
 गणेश पांढरे @ जळगाव प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील शेदुणी येथे जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिना निमित्त येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रामधील कोरोना योध्यांचा सन्मान जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला सेल तर्फे प्रमाणपत्र आणि फेश शिल्ड देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जि प सदस्या सरोजिनी संजय गरुड, नगरसेविका सौ.भावना जैन, सौ. मोहसिना फारूख खाटीक, सौ योगिता रविंद्र गुजर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे 

वैद्यकिय अधिकारी डॉ . राहुल निकम, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष रविंद्र गुजर, शिवराज गरूड, धिरज जैन, फारूख खाटीक आदी मान्यवर उपस्थीत होते.तर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परीचारीका डॉ. श्रद्धा पाटील, आरोग्य सेविका राजश्री पाटील, मालती फडणीस, सविता कुमावत, श्रीमती घाटे, अल्का लोणे, मंजु जावळे यांना 


सन्मानपत्र आणि फेश शिल्ड देऊन कोरोना योध्या म्हणुन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र गुजर यांनी तर आभार आरोग्य सेविका राजश्री पाटील यांनी मानले. यावेळी डॉ राहुल निकम यांनी गावातील आरोग्य विषयक उपाययोजनांचा आढावा सांगितला. तसेच, सर्वांच्या सहकाऱ्यातुन कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्यास नक्की आळा बसेल असा विश्वास असल्याचे मत व्यक्त केले.