वंचित बहुजन आघाडीची मागणी
मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत मागासवर्गीय महिला पोलिस कर्मचारी यांचा त्याच पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत जातीयवादी पोलीस कर्मचारी श्याम किसन कपले याने विनयभंग करून रिव्हाल्वरने उडवून देऊन जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
फिर्यादी मागासवर्गीय महिला पोलीस कर्मचारी मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये मागील 4 वर्षांपासून सनापोकॉ म्हणून कार्यरत आहे आणि आरोपी पोलीस कर्मचारी श्याम कपले रा.मलकापूर हा सुद्धा याच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे व आरोपी मागील 6 महिन्यापासून फिर्यादीचा पाठलाग करून त्रास देत होता अश्यातच आरोपीने फिर्यादी महिला पोलिस कर्मचारीचा हात पकडून विनयभंग केला त्यावेळी फिर्यादी यांनी त्याच्या थोबाडीत लगावली होती यामूळे आरोपीने फिर्यादिस याचा अंजाम खूप वाईट होईल असे बोलून रिव्हाल्वरने उडवून देऊन जीवे मारण्याची धमकी दिली तसेच 27 मे 2020 रोजी सुद्धा फिर्यादी महिला पोलीस कर्मचारी ह्या ड्युटीवर हजर असतांना आरोपी श्याम कपले याने मर्डर करण्याची धमकी दिली.
घडलेल्या प्रकाराबाबत दिनांक 28 मे 2020 रोजी महिला पोलीस कर्मचारी यांनी मलकापूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार अर्ज दिला होता व जबाब सुद्धा नोंदविला होता सदर प्रकरण चौकशीवर होते.
पोलीस कर्मचारी श्याम कपले याने जीवे मारण्याच्या दिलेल्या धमकीमुळे व होणाऱ्या त्रासाला कंटाळून अत्याचारग्रस्त मागासवर्गीय महिला पोलिस कर्मचारी यांनी 4 जून 2020 रोजी मलकापूर शहर पोलिस स्टेशन मध्ये पोलीस कर्मचारी शाम किसन कपले याच्याविरुद्ध विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत तक्रार दाखल केली.
त्या अनुषंगाने पोलीस कर्मचारी शाम किसन कपले यांच्यावर मलकापूर शहर पोलीस स्टेशन मध्ये अपराध क्रमांक 378 /2020 नुसार अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 3 (1)(w), 3(1)(w)(i), 3(1)(w)(ii), 3(2)(Va) व भारतीय दंड संहिता 354, 354(A), 354(D) या कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे .
परंतु आरोपीवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यावर सुद्धा त्याला अटक किंवा निलंबनाची कार्यवाही अद्याप करण्यात आलेली नाही त्यामुळे सदर जातीयवादी आरोपीस स्थानिक पोलिस स्टेशन सहकार्य करून पाठीशी तर घालीत नाही ना...? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही तसेच आरोपी हा शहरात उजळ माथ्याने फिरत आहे आणि या सर्व पार्श्वभूमी मुळे हा मागासवर्गीय महिला पोलीस कर्मचाऱ्यावर एक प्रकारचा अन्याय होत आहे,
सदर आरोपी मुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन होत आहे,याअगोदरही मलकापूर येथे एका कॉलनी मध्ये या आरोपीला स्थानिक रहिवाशांनी महिलेसोबत चाळे करीत असताना रंगेहात पकडून चोप दिला होता तसेच अशा आशयाच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांमध्येही प्रसिद्ध झाल्या होत्या.
याउलट फिर्यादी महिला पोलीस कर्मचारी यांनी दामिनी पथक प्रमुख म्हणून कार्य करीत असतांना मलकापूर शहर व परिसरात उल्लेखनीय असे कार्य केलेले आहे व परिसरात टवाळखोरी करणाऱ्या व महिलांची छेड काढणाऱ्या वर जरब बसवलेली आहे,तसेच शाळा-कॉलेजेस सामाजिक कार्यक्रमात मुलींना वेळोवेळी मार्गदर्शन करीत त्यांची हिंमत वाढवण्याचे व महिला सक्षमीकरनाचे कार्य करीत आहे त्यानुषंगाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल यांचा ठीकठिकाणी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आलेला आहे यामुळे पोलिस प्रशासनाचा सन्मान व मान उंचावलेली आहे.
सदर आरोपीची प्रवृत्ती ही गुन्हेगारी स्वरूपाची दिसून येत आहे व या आरोपी पासून फिर्यादी पोलीस कर्मचारी यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे तरी आरोपी पोलिस कर्मचारी शाम किसन कपले यास त्वरित अटक करून त्याला निलंबित करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी बुलडाणा जिल्हा नेते अतिशभाई खराटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा करून व निवेदन देऊन केली आहे व मागासवर्गीय महिला पोलिस कर्मचारी यांना न्याय द्यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला आहे .
याबाबतची निवेदनाची प्रत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह संबंधीत यंत्रणेला सुद्धा देण्यात आले आहे.
