Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ग्रामीण युवा संघटना पातुर तालुका उपाध्यक्ष मा.क्रिष्णाभाऊ ठाकरे याच्या वतीने चौंढी येथे वृक्षारोपण करण्यात आले

Responsive Ad Here
मुकेश हातोले @प्रतिनिधी पातुर तालुका

दिवशेदिवस दुष्काळाची वाठती तिव्रता,पाणी टंचाई ची स्थिती तसेच पावसाचे अनियमीत आगमन या मुळे पर्यावरणचे संतुलन बिघडु लागले आहे.शिवाय परिपूर्ण वाढलेली दोन झाडे चारजनांच्या कुटूबांसाठी पुरेसा ठरेल एवढा ऑक्सिजन निर्माण करतात. वाठत्या प्रदुषणामुळे पर्यावरण रक्षणाचे महत्व पटू लागले आहेत. रोपण केलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.या सर्व गोष्टींचा विचार करून जनजागृती करण्यासाठी ग्रामीण युवा बहुद्देशिय संस्था तुलंगा बु अकोला जिल्हा 


तथा ग्रामीण युवा संघटना अकोला महाराष्ट्र राज्य यांनी पुर्ण जिल्ह्यामध्ये या वर्षी जास्तीत जास्त वृक्षारोपण लागवड करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. २४\६\२०२० रोजी  संस्थापक/अध्यक्ष मा.सतिशभाऊ देवराव हातोले यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.कृष्णाभाऊ ठाकरे (ता.उपाध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली  पातुर तालुक्यातील चौंढी येथील स्मशानभूमी मध्ये वृक्षारोपण लागवडीची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाला सहभागी म्हणुन लाभलेले  मा.सुनील ठाकरे,जिवन ठाकरे, कैलास लोखंडे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.