नंदकिशोर इंगळे @प्रतिनिधी अमरावती
कोविड 19 रोगामुळे महाराष्ट्र कूषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे व डॉ पंजाबराव देशमुख कूषी विद्यापीठ अकोला यांचा निरदेशानुसार ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करण्याचे सुचविण्यात आले.
त्या नुसार श्री शिवाजी शिक्षण संस्था अम.द्वारा संचालित श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय अम.यांच्या वतीने पापळ गावी शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा डॉ शशांक देशमुख यांच्या प्रेरणेने व प्रा मीरा ठोके, प्रा डॉ निरज निस्ताने, प्रा मयूर गावंडे, प्रा,फुटाणे, प्रा,शितल डगवार,प्रा कल्पना कुर्हाडे,प्रा,गौरव ठाकरे प्रा हरिष फरकाडे यांच्या मार्गदर्शनात या शेतीशाळेचेकेले गेले.
श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयची अंतिम वर्षाची विद्यार्थीनी मनिषा चारसल हिने शेतकऱ्यांना
सेंद्रिय शेती व त्यासाठी उपयुक्त ठरणारे कंपोस्ट खत व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली तसेच संत्रा झाडावरील विविध रोग, विविध किड यांचे व्यवस्थापन कसे करावे हे समजावून सांगितले.
यावेळी शेतीशाळेला गावातील शेतकरी योगेश्वर चोरे, जामुवंत चारसल,धीरज मोकळे प्रभाकर सोनटक्के नवयुवक शेतकरी पुरुष पुरस्कार प्राप्त असलेले सागर पोच्छी, यांनी सोशल डिस्टन्सींग चे पालन करून सहभाग घेतला.
