शिवदास सोनोने जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
जामोद येथील जुन्या पोलीस चौकी जवळील वॉर्ड क्र .५ मध्ये काही ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याचे पाइपलाइनचे काम थांबविले होते . दरम्यान या प्रकरणात ठाणेदार सुनिल जाधव यांनी मध्यस्थी करुन थांबलेल्या पाइप लाइनचे काम पुन्हा सुरु केले आहे . यामुळे या भागातील नागरिकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .
वारी हनुमान येथून १४० गाव पाणी पुरवठा योजनेची पाइपलाइनचे आली आहे . मात्र या पाइप लाइनचे काम या भागातील तीन ते चार नागरिकांनी थांबविले होते . यासह सरकारी रस्ता खोदण्यास मनाई करुन ती पाइप लाईन रोखली होती . यासाठी त्यांना विरोधी पक्षाच्या सदस्यांचा छुपा पाठींबा होता . ग्रामपंचायत मध्ये सत्ता भाजपची आहे . ह्या पाईपलाईनचा ठराव पुढे असतांना काही अंतरावरच मध्येच ही पाइपलाइन रोखून आम्ही तुम्हाला पुढे पाइप लाईन टाकून देवू असे सांगितले होते .
दरम्यान काम सुरू हे काम थंड बस्त्यात पडले . त्यामुळे
दोन वर्षापासून या भागातील वीस पंचवीस कुटुंबांना पाण्यासाठी वण वण भटकंती करावी लागत आहे . या कुटुंबाची पाहण्यासाठीची होणारी भटकंती थांबविण्यासाठी मागील चार - पाच दिवसापुर्वी ग्रामपंचायतचे सरपंच , ग्रामसेवक व पोलिसांच्या उपस्थितीमध्ये रोखण्यात आलेल्या पाइप लाइनच्या कामाची घटनास्थळी जावून पाहणी केली . यासह पाइप लाईन न अडाण्यासंबंधी व कामकाज चालू करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले . ही शासकीय पाइप लाईन ग्रामपंचायतच्या मालकीची असल्याने ती तुम्ही रोखू शकत नाही अशी समज ठाणेदार सुनिल जाधव यांनी दिली . त्याच बरोबर पोलीस संरक्षणात पाइप लाइनचे काम सुरु करण्याचे आदेश दिले आहे . अडविण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम ठाणेदारांच्या मध्यस्थीने पुन्हा सुरु झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
