मेहकर प्रतिनिधी विष्णु आखरे
२३ मार्च पासुन सलुन व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.नाभिक समाज बांधवानी वेळोवेळी निवेदना द्वारे मदत करण्याची विनंती केली. परंतु शासनाने त्याची दखल घेतली नाही. आज महाराष्ट्रा मध्ये लॉकडाऊन मध्ये बऱ्याच प्रमाणात सुट देऊन इतर व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. परंतु सलुन व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही.
राज्यात सलुन धारकांची उपासमारी होत असताना सलुन व्यवसायिक हवालदील होऊन नैराश्यातुन आत्महत्या करण्याचे प्रामाण सुद्धा वाढत आहे.त्यामुळे राज्य सराकरने कर्नाटक सरकारने सलुन व्यवासायिकांना जाहीर केलेल्या मदतीच्या धर्तीवर आपण महाराष्ट्रातील सलुन व्यवासायिकांनासुद्धा मदत जाहीर करावी.व त्यांचे तिन महिनाचे विजबील आणी दुकान भाडे माफ करुन त्यांना आरोग्य विभागा मार्फत पिपिकिट देऊन सलुन व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी अशाप्रकारे निवेदनाद्वारे केली असून सदर निवेदन रयत क्रांती संघटनेचे प्रदेशप्रवक्ता धनंजय (जितू) अडेलकर,याच्यांमार्गदशत दि 22 जुन रोजी मेहकर उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना केली आहे सदर निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गवई,माधवराव ससाने, ज्ञानेश्वर झगरे अदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.
