Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

चक्रीवादळ चा धोका टाळण्यासाठी एरंडोल नगर परिषद कडून उपाययोजना

Responsive Ad Here

गणेश महाजन@ एरंडोल तालुका प्रतिनिधी

एरंडोल नगरपरिषद, हद्दीतील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, सद्या राज्य मध्ये चक्री वादळाचा व अतिवृष्टी होण्याचा धोका निर्माण झालेला असून एरंडोल शहरातील धोकादायक असणाऱ्या इमारती चक्री वादळामुळे व पावसामुळे पडून नागरिकांच्या व पाळीव प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी नागरिकांनी खालील सूचनांचे पालन करावे.
1. वादळामुळे व पावसामुळे धोका संभवणाऱ्या इमारती सोडून इतर सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे.मोडकळीस आलेल्या इमारती किंवा घरात जाऊ नका.
2. वादळामुळे व पावसामुळे धोका संभवणाऱ्या पाळीव प्राण्यांची सुरक्षित स्थळी व्यवस्था करावी.
3. अत्यावशक असेल तरच घराबाहेर पडावे.
4. अनावश्यक प्रवास टाळावा.
5. मोठी झाडे वादळामुळे पडण्याची शक्यता  असल्याने  अशा झाडाखाली निवारा घेणे  टाळावे.
6. वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर अथवा इतरत्र पडलेल्या वीज तारांचा स्पर्श टाळावा.
8. दारं खिडक्या बंद ठेवाव्यात.
9. माहितीसाठी न्यूज चॅनल, रेडिओ ऐकत रहा.
10. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ  नका.
11. फक्त प्रशासनाच्या सूचना वेळोवेळी पाळा.
तरी या गोष्टींचे पालन करून नगरपरिषद प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे. व सुरक्षित रहावे ही नम्र विनंती.
मुख्याधिकारी एरंडोल नगरपरिषद, एरंडोल