Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शेतकरी व नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्या, खासदार रामदास तडस यांच्या अधिका-यांना सुचना

Responsive Ad Here
रवी मारोतकर @प्रतिनिधी नांदगाव खंडेश्वर

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर खासदार रामदास तडस व आमदार प्रदापदादा अडसड यांनी येथे   घेतली आढावा बैठक.खरिप हंगाम सुरु झाल्यामुळे पिक कर्जाचे वाटप तातडीने करावे
चंदूर (रेल्वे): कोरोना विषाणूच्या संकटकाळात प्रशासनाने विधानसभा मतदारसंघात केलेल्या उपाययोजना व शेतकरी, शेतमजुराचे सोडविण्याकरिता कारवाईची माहिती घेण्याकरिता खासदार रामदास तडस यांनी मंगळवार (ता. 23 येथील आढावा बैठक घेतली. बैठकीला आमदार प्रतापदादा अडसड यांची उपस्थिती होती. विविध विषयांवर चर्चा करताना शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यात यावे, अशी सूचना खासदार तडस यांनी अधिका-यांना केली बैठकीला  विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


यावेळी चांदूर-धामणगांव विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यांत कोरोनासंदर्भात केलेल्या उपाययोजना, जिल्हाधिकारी यांच्या सुचने प्रमाणे दुस-या जिल्हयातुन येणा-या नागरिकांना गृह विलगीकरण किंवा संस्थात्मक विलगीकरण करण्याची खबरदारी घ्यावी, खरीप हंगामाकरिता शेतक-यांना पीककर्जाचे शेतक-यांच्या तक्रारींवर प्रशासनाने केलेली कारवाई, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभाथ्र्याना केंद्राच्या निर्देशाप्रमाणे केलेले धान्याचे वाटप, पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत तीन महिन्यांकरिता एलपीजी गॅस सिलिंडरचे वाटप आदींविषयी आढावा बैठकीत माहिती घेण्यात आली.

खरीप हंगाम सुरू होऊनही कर्जवाटपाची प्रक्रिया गतीने राबविली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींवर प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन शेतक-र्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. विधानसभा मतदारसंघातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. कोराणासंदर्भात  चौकी वाढविण्यात यावी असे पोलिस विभागाला सागितल तसेच चांदुर रेल्व् रोड जोडण्या याबाबत पाहणी करण्यात आली व सुचना दिल्या बैठकीत समंधित अधिकार्या सुचना देण्यात आल्या.