Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पंचनामे करण्यासाठी कृषी विभागाची टीम व स्वाभिमानी शेतकरी संघटना थेट शेतक-यांच्या बांधावर दुबार पेरणीसाठी शेतक-यांना तत्काळ खते, बियाणे द्या- प्रशांत डिक्कर

Responsive Ad Here
शिवदास सोनवणे@ प्रतिनिधी जिल्हा बुलढाणा

 जिल्ह्यात  दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोफत खते व बियाणे द्यावे, व ज्या कंपनीदाराने व विक्रेत्या़नी बोगस सोयाबिन बियाणे देउन शेतक-यांची फसवणुक केली त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी कृषी विभागा मार्फत सरकारकडे केली आहे. त्यामुळे आज संग्रामपूर तालुक्यातील निरोड शिवारात तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, पं.स.कृषी अधिकारी सी.पी उंद्रे व कृषी विभागाचे कर्मचारी यांचे कडुन पंचनामे करण्यात आले. 


पंरतु अशा परिस्थितीत राज्य सरकारने विनाविलंब दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना तत्काळ मोफत खते आणि बियाणे उपलब्ध करावेत अशी मागणी या वेळी करण्यात आली. पंचनामा स्थळी रोशन देशमुख, प्रतिक गावंडे, शांताराम अवचार, अनूप देशमुख, उमेश सौदागर, मोहन अवचार, प्रतिक देशमुख,चंद्रकांत बोरसे, अमोल आगरकर, अमित देशमुख, सोनाजी कोठे, सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.