Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

श्रुती सुजित अग्रवाल चे सुयश संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण

Responsive Ad Here

प्रतिनिधी@जितेश कारीया



बोरगाव मंजू येथील रहिवासी आणि अकोल्याच्या स्कूल ऑफ स्कॉलर्स (SOS) ची विद्यार्थिनी कु. श्रुती सुजित अग्रवाल हिने दहावी सी.बी.एस.ई. पॅटर्न मध्ये सुयश मिळविले असून संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून सर्व विषयांच्या टक्केवारी मध्ये 93.4 टक्के गुण मिळविले आहेत. श्रुतीला घडवण्यासाठी प्राचार्य मनीषा उंबरकार आणि सर्व शिक्षक गण यांनी अतोनात मेहनत घेतली. संस्कृत विषया करिता मायबोली कोचिंग क्लासेसच्या सीमा बक्षी यांच्याकडून तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. श्रुतीचे कुटुंब संयुक्त कुटुंब असल्याने आजोबा गोविंदरामजी अग्रवाल, आजी सरलाबाई, वडील सुजित, आई सीमा, काका सचिन, नितीन अमोल अग्रवाल  यांच्यासह सर्व कुटुंबीयांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले. आपल्या यशाचे श्रेय श्रुतीने प्राचार्य, सर्व गुरुजन,  आणि संपूर्ण कुटुंबीयांना दिले आहे. आता श्रुतीने नीट परीक्षेची तयारी सुरू केली असून तिने भविष्यात डॉक्टर होण्याचे ध्येय ठेवले आहे.