प्रतिनिधी @ जितेश कारीया
हिवरखेड :- चितलवाडी येथील रंगनाथ महाराज कनिष्ठ महाविद्यालयाने विज्ञान शाखेत सतत गेल्या चार वर्षांपासून 100% निकालाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे.
गेल्या चार वर्षांपासून या विद्यलयाचा विज्ञान शाखेत 100% निकालासह कला शाखेतही 78% निकाल लागला आहे. या निकालामुळे विद्यलयाचे मुख्याध्यापक तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
