प्रतिनिधी@पवन चव्हाण
नांदुरा येथे तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार करून खून करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार आज दिनांक 24 जूनच्या दुपारी साडेतीन वाजे दरम्यान नांदुरा पंचायत समितीच्या मागील भागात घडला. दरम्यान यातील नराधमास नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
याबाबत प्राप्त माहितीनुसार स्टेशन रोड परिसरात राहणाऱ्या तीन वर्षीय बालिका अंगणात खेळत असताना नैनेश लक्ष्मणदास रामचंदानी वय 24 राहणार नांदुरा याने सदर बालिकेला कडेवर उचलून नेऊन पंचायत समिती व पशुवैद्यकीय दवाखान्याच्या मागील ओसाड व झाडाझुडपांनी गजबजलेल्या निवांत जागी तिला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करत होता. दरम्यान पंचायत समितीमधील एका कर्मचाऱ्याला मुलीच्या रडण्याचा आवाज आला त्याने दवाखान्यातील कर्मचाऱ्यांसह आवाजाच्या दिशेने घटनास्थळ गाठले तोपर्यंत आरोपीने तिथून पळ काढला होता. यावेळी मुलीच्या गळ्याला तिच्यात अंगातील कपड्यांनी गळफास देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले यावेळी काही तरुणांनी त्या नराधमाचा शोध घेऊन त्याला पकडून चोप दिला. व पोलिसांच्या स्वाधीन केले सदर बालिकेला नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खामगाव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले . सदर यूवकावर अॅक्ट्रासीटी अॅक्ट, खूनाचा प्रयत्न करने व बलात्कार, पोक्सो कायद्यानुसार नांदूरा पोलीसांनी गून्हा नोंद केल्याचे समजले.
यावेळी विविध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्यात हजर होते व आरोपीवर कडक कार्यवाही करण्याची मागणी करीत होते.

