प्रतिनिधी@ पवन चव्हाण
जळगाव (जामोद:दि.२४ गोंद तस्करीच्या खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी देऊन शेतकऱ्यांची लाखो रुपये आर्थिक लूट करणाऱ्या जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी खान यांचा वनपरिक्षेत्र अधिकारी पदाचा पदभार काढला असला तरी मुद्दे मालासह मुळ आरोपीचा शोध लागत नाही तो पर्यंत हा लढा चालुच ठेवणार असल्याचे स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सांगीतले आहे. अवैध सागवान तस्करी ,अवैध वृक्षतोड, गोंद तस्करी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडीत रंगेहात पकडले अशा विविध प्रकरणात गुंतलेले प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी यांची खान यांच्याकडे एक वर्षापासून वनपरिक्षेत्र अधिकारी पदाचा प्रभार होता. त्यांचे कार्यकाळात सातपुडा पर्वत परिसराची वाटचाल ही वाळवंटाकडे होत असल्याने कर्तव्याला लगाम देत या सातपुड्यात तस्करांच्या टोळ्या सक्रिय करण्यात या अधिका-यांचा मोठा वाटा आहे. तस्करांच्या तालमीलमधे सहभागी असलेले एच जी खान यांचे सह काहि कर्मचारी यांनी २१ जुन च्या रात्री गोंध पकडल्याचे खात्रीलायक माहिती डिक्कर यांना मीळाली होती पंरतु त्यामधे अर्थपुर्ण व्यवहार केल्याने गोंध तस्करांना सोडण्यात आले व जप्त केलेला गोंधिचा मुद्दे माल वन कर्मचा-यांनी खासगी व्यापा-यांना विकला असल्याचा आरोप प्रशांत डिक्कर यांनी केला आहे. वन अधिका-यांनी विकलेला माल कोण्या व्यापा-यांनी घेतला त्या व्यापा-यासह मुद्दे मालाचा चौकशीतुन शोध लागत नाही आणी कर्तव्यास कसुर करणा-या वन अधिका-यावर बडतर्फची कारवाई होत नाही तो पर्यंत हा लढा चालुच राहणार असल्याचे प्रशांत डिक्कर यांनी सांगीतले आहे. या प्रकरणा बाबत लवकरच मुख्य वन संरक्षक अमरावती व वन मंत्री महोदयाची भेट घेणार असल्याचेही डिक्कर यांनी आमच्या प्रतिनिधीसी बोलतांना सांगीतले आहे.

