किरण सुपेकर प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसा पासून जिल्ह्यात लॉक डाऊन संदर्भात सोशल मीडियावर मॅसेज फिरत आहेत. व दिनांक 9 जुलै पासून लॉक डाऊन सुरू होणार असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे.परंतु सद्यस्थितीत जिल्ह्यातील कांही कुटुंब, व्यक्ती बाहेरगावी व इतर जिल्ह्यात अडकून आहेत.तसेच इतर जिल्ह्यातील व्यक्ती सुध्दा आपल्या जिल्ह्यात अडकून आहेत, त्यांना जाण्या -येण्यासाठी वेळ
मिळावा तसेच अनेकांची विविध कामे अडकुन आहेत,कांहीचे लग्न,साखरपुडा, व कांही ग्रामीण भागातील व्यक्ती आपली बिमारी व विविध उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी गोळ्या औषधीं घेण्यासाठी येतात.आणि कांहीं मोलमजुरी करणाऱ्या व जनसामान्य लोकांना राशन,व विविध खरेदी विक्री तसेच शेतकरी बांधवांना खते,औषधी ,शेतातील कामे, पिकवणी असे अनेक कामे आहेत.विविध क्षेत्रांतील लोकांच्या अनेक समस्या, खरेदी विक्री,व्यवहार करण्यास मुभा मिळणे
आवश्यक आहे.तरी जिल्हाधिकारी साहेबांनी चार दिवस आधी पूर्वसूचना देऊन लॉक डाऊन करावे .जेणे करून गोरगरीब, जनसामान्य, व्यापारी ,शेतकरी ,कर्मचारी यांची हेळसांड होऊ नये.ही विनंतीपूर्वक मागणी करण्यात येत आहे. तरी साहेबानी जिल्ह्यातील परिस्थिती विचार करून लॉक डाऊन करावा .ही नम्र विनंती.

