प्रतिनिधी शुभम बेद्रे
हदगाव नगर पालिकेतील राखिव असलेला सन 2019 - 2020 चा उर्वरीत 5% दिव्यांग निधी तात्काळ द्यावा. याकरिता दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक तथा जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी 15 जुलै रोजी तिव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक प्रशासनाला दिला होता. त्या अनुषंगाने हदगांव नगर पालिकेने 86 दिव्यांग व्यक्तीला मागील लाॅक डाऊनच्या काळात प्रत्येकी 1000 हजार रुपये प्रमाणे दिव्यांग निधी दिव्यांगाच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. तो निधी स्व उत्पन्नानुसार दिला नव्हता व तसेच कमी निधी दिल्याने या विषयी दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक तथा जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी 15 जुलै पर्यंत उर्वरित 5% दिव्यांग निधी तात्काळ दिव्यांगाच्या बॅक खात्यात जमा करण्यात यावेत.अन्यथा हदगांव नगर पालिकेत सर्व दिव्यांग व्यक्तीसह 15 जुलै रोजी तिव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. व तसेच या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब व दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे आणि विभागीय आयुक्तालय औरंगाबाद व तसेच सर्व वरिष्ठ शासकीय पातळीवर वेळोवेळी पत्र व्यवहार आणि सतत पाठपुरावा केल्यामुळे संबंधित सर्व प्रसाशनाने हदगांव नगर पालिकेला तात्काळ 5% दिव्यांग निधी देण्याचे आदेश दिले.त्यामुळे हदगांव नगर पालिकेने शहरातील 86 दिव्यांग व्यक्तीच्या प्रत्येकी खात्यात उर्वरित 1500 रुपये प्रमाणे 5% दिव्यांग निधी जमा केला. असे एकुण सन 2019 ते 2020 या वर्षातील 5% दिव्यांग निधी प्रत्येकी 2500 रुपये निधी दिला आहे.व तसेच चालु सन 2020-2021 या वर्षातील अतिरिक्त दिव्यांग निधी देण्याची कार्यवाही चालु असुन सर्व साधारण सभेत ठराव घेऊन दिव्यांगाच्या बॅक खात्यात तात्काळ जमा करण्याची कार्यवाही चालु आहे. दिव्यांगाच्या निधी बाबत विशेष तरतुद करण्यात येईल. दिव्यांगाच्या सर्व समस्या तात्काळ सोडवण्यात येईल.असे आश्वाशन नगर परिषदेतील मुख्याधिकारी विजयजी येरावाड तसेच लेखापाल श्यामसुंदर मोरे यांनी दिव्यांग विकास समितीला दिले आहे. त्यामुळे दिव्यांगाला काही फार प्रमाणात का होईना लाॅक डाऊनच्या काळात कोरोना विषांणुच्या संकटावर मात करण्यासाठी व तसेच कठिण जिवन जगण्यात पुरेशी मदत झाली आहे.
या कामात दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांच्या कार्यास यश आले आहे.त्यामुळे दिव्यांग विकास संघर्ष समिती कडुन नगर पालिकेचे मुख्याधिकारी विजयजी येरावाड साहेब, कार्यालयीन अधीक्षक मोनाली रावते व लेखापाल श्यामसुंदर मोरे, लेखा परीक्षक चक्रपाणी कदम यांचे आभार दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी मानले. त्यावेळी त्यांच्या सोबत जमीर पटेल, अजिंक्य अशोक चव्हाण, फारुख कुरैशी, रमेश गोडबोले, अहेमद भाई, बंडु पाटे, फहिमोदीन सरवरी, अंकुश कदम, अ. खलील खान, मारोती लांडगे, शेख इम्रान, सुरज राठोड, शेख गौस, शेख सलमा, धुरपत सुर्यवंशी, शबाना शेख, शेख सलीम, प्रियंका राठोड, शेख साजित, केशव वाठोरे, आकाश सोनुले, रतन कुरैशी, पवन गंधारे, महेश चव्हाण, कांचन गणेश वानखेडे ईत्यादी दिव्यांग व्यक्तीसह यावेळी उपस्थित होते...
