Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्या ग्रा.पं. कर्मचारी युनियनचे आमदार मिटकरी यांना साकडे.

Responsive Ad Here
हिवरखेड प्रतिनिधी:-जितेश कारीया@ 

महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करून न्याय मिळवून द्यावा असे साकडे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ने आमदार अमोल मिटकरी यांना घातले आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायती मिळून 60,000 च्या वर ग्रामपंचायत कर्मचारी कार्यरत असून तुटपुंज्या वेतनावर अहोरात्र काम करीत आहेत. यामध्ये त्यांचा घरखर्च सुद्धा भागत नाही. मागील 20 वर्षांपासून युनियनच्या माध्यमाने मागण्या बाबत कर्मचारी लढा देत आहेत. परंतु आश्वासनांव्यतिरिक्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हाती आजपर्यंत काहीही लागलेले नाही.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत ज्यामध्ये त्यांना
नगर परिषद, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी,
आयोगाच्या परिपत्रकानुसार किमान सुधारित वेतन लागू करावे,
निवृत्ती वेतन लागू करावे,
दौऱ्यादरम्यान देण्यात आले.
सदर निवेदन सदानंद पाटिल दलवी अध्यक्ष ग्राम पंचायत कर्मचारी यूनियन 4511 जावेद खान पठाण सहसचिव ग्राम पंचायत कर्मचारी यूनियन 4511 तेल्हरा तालुका यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी विविध गावांमधील अनेक ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.