Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पत्रकारांना संरक्षण द्या- रासप जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर

Responsive Ad Here
 शिवदास सोनोने

    मलकापुरात पत्रकार अजय टप त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ  राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांनी  पत्रकार अजय टप यांना मारहाण करणाऱ्या समाज कंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना  निवेदनाद्वारे केली आहे.
        लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार बांधव आपले प्राण धोक्यात घालून सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरस च्या महामारी मध्ये देखील आपले कर्तव्य बजावत आहेत. परंतु हे कर्तव्य बजावत असताना काही समाज कंटकांकडून त्यांना धमकावणे मारहाण करणे अशा प्रकारच्या घटना या पत्रकारांची मुस्कटदाबी करणाऱ्या आहेत. मलकापूर उपविभागातील पोलीस व प्रशासन पत्रकारांवर होणाऱ्या हल्ला मारहाण धमक्या इत्यादी प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष घालत नसल्याने तसेच पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या लोकांवर थातुर-मातुर कारवाई करून त्यांना मोकळीक दिली जात असल्यामुळे पत्रकारांवर हल्ले होण्याच्या घटना सर्रास घडत आहेत. 
अश्या अशावेळी शासनाने कठोर भूमिका घेऊन पत्रकारांना संरक्षण पुरवून गुन्हेगारांवर पत्रकार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले पाहिजे. मलकापूर येथील दैनिक नवभारताचे पत्रकार तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अजय टप यांना मलकापूर नगरपालिका परिसरात काही समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला करून मारहाण केली. यामुळे पत्रकार अजय टप त्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकारी वर्गाने सदर प्रकरणात लक्ष घालून  आरोपीला कठोर शिक्षा करणे गरजेचे आहे. तरी शासनाने सदर आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा करावी तसेच पत्रकार अजय टप यांना पोलिस संरक्षण द्यावे.
    अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे प्रशासनाने आरोपींवर कठोर कारवाई न केल्यास राष्ट्रीय समाज पक्षातर्फे जिल्हाभर आंदोलने केले जातील असा इशाराही या वेळेला धनश्रीताई काटीकर पाटील यांनी प्रशासनाला दिलेला आहे.