ता.पातुरप्रतिनीधी@मुकेश हातोले
दिवशेदिवस दुष्काळाची वाठती तिव्रता,पाणी टंचाई ची स्थिती तसेच पावसाचे अनियमीत आगमन या मुळे पर्यावरणचे संतुलन बिघडु लागले आहे.शिवाय परिपूर्ण वाढलेली दोन झाडे चारजनांच्या कुटूबांसाठी पुरेसा ठरेल एवढा ऑक्सिजन निर्माण करतात. वाठत्या प्रदुषणामुळे पर्यावरण रक्षणाचे महत्व पटू लागले आहेत.
रोपण केलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.या सर्व गोष्टींचा विचार करूनजनजागृती करण्यासाठी ग्रामीण युवा बहुद्देशिय संस्था तुलंगा बु अकोला जिल्हा तथा ग्रामीण युवा संघटना अकोला महाराष्ट्र राज्य यांनी पुर्ण जिल्ह्यामध्ये या वर्षी जास्तीत जास्त वृक्षारोपण लागवड करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. १०\७\२०२० रोजी संस्थापक/अध्यक्ष मा.सतिशभाऊ देवराव हातोले यांच्या मार्गदर्शनाखाली मा.सतिषकुमार हातोले(जिल्हा संघटक)यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त इतरत्र खर्च न करता ग्रामीण युवा संघटनेने जो विडा उचलला आहे झाडे लागवडीचा त्या अनुषंगाने सतिष कुमार भारत हातोले यांनी मांडवा बु.येथे स्मशानभूमीत झाडे लावण्यात आले.कार्यक्रमाला सहभागी म्हणुन लाभलेले मा.सतिषकुमार हातोले (अकोला जिल्हा संघटक), मा.राष्ट्रपालभाऊ भोजने (बाळापुर ता.(कोषाध्यक्ष) नितेश इंगळे, आकाश गवई, कैलास शेगोकार, सुमित गवई, अक्षय इंगळे, विश्वजीत इंगळे , मंगेश सिरसाट इ. कार्यकर्ते उपस्थित होते...

