राजू कलाने प्रतिनिधी अमरावती
चांदूर रेल्वे :- साऱ्या जगाला कोरोना माहामारीने घेरलेअसून यामुळे लाखो लोकांचे रोजगार हिरावल्या गेले आहे तसेच उद्योगधंदे अजूनही पुर्वपदावर आले नाही सामान्य जनता जिवन जगण्यासाठी धडपड करीत असतांनाच सरकारने पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढवल्याने सामान्य जनता हैराण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.जिवन जगण्याची धडपड व दुसरीकडे पेट्रोल डिझेलचे गगणाला भिडलेले भाव पाहता .बाप भिक मागु देईना आणि आई जेऊ घालेना अश्या दुहेरी संकटामुळे जनता त्रस्त झाली आहे दि्. ७ जून पासून दररोज इंधनाच्या दर वाढत असून शनिवार पर्यंत हि वाढ पाहता पेट्रोलमध्ये प्रति लि. ९:१२ रुपये तर डिझेलमध्ये प्रति लि. ११:०१ रुपये वाढ करण्यात आली आहे. देशभऱ्यात पेट्रोलच्या किमंती प्रति लिटर ८७:८८ रुपयांच्या पुढे गेलेल्या आहेत तर दिल्लीमध्ये पेट्रोल डिझेल जास्त महाग आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती निच्चांक पातळीवर असताना त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही हा जनतेवर एक प्रकारचा अन्यायच आहे.वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या
तेलाच्या किमतीचा विचार करून देशाअंतर्गत इंधनाचे दर ठरविले जात असताना सध्या ही पारदर्शकता दिसून येत नाही २०१४ मध्ये पेट्रोल वर उत्पादन शुल्क हे ९:४० रु. तर डिझेलवर ३:५६ रु. होते सध्या हे शुल्क पेट्रोलवर ३२:९८ रु.तर डिझेलवर ३१: ८३ रु. असे आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती पाहता पेट्रोल डिझेलचा लाभ सरळ जनतेला देणे शक्य आहे जनता सध्या दुहेरी संकटात असल्याने जनतेला पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करून दिलासा द्यावा अशी मागणीचे निवेदन महामहिम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत माजी आमदार विरेंद्र जगताप , पाठविण्यात आले. तसेच या वेळी परीक्षित जगताप, प्रदीप वाघ, प्रभाकर वाघ, श्री निवास सूर्यवंशी, वर्षा ताई देशमुख, निलेश उर्फ शिट्टू सूर्यवंशी,देवानंद खुणे, अविनाश वानरे, प्रफुल कोकाटे, जगदीश आरेकर, गोविंदराव देशमुख, गोटू गायकवाड, अमोल होले, सुनील गावंडे, भेंडे इत्यादी सर्व चांदूर रेल्वे येथील काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

