Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बोंडअळीग्रस्त कपाशीची किटकशास्त्र प्रमुखांनी केली पाहणी

Responsive Ad Here

हिवरखेड प्रतिनिधी@जितेश कारीया


तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील परिसरात बागायतदार शेतकऱ्यांनी मान्सुन पुर्व कपाशी लागवड केली होती त्यामुळे त्या कपाशी वर बोंड अळी आल्याने शेतकरी हतबल झाला होता. ही बाब माहिती होताच डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथील किटकशास्र प्रमुख डॉ उंदीरवाडे यांनी तळेगाव बाजार शेतात जाऊन कपाशी लागवडची पाहणी केली. तळेगाव बाजार येथील परिसरात बागायतदार शेतकऱ्यांनी मान्सुन पुर्व कपाशी लागवड केली होती. त्यामुळे त्या कपाशी वर बोंड अळी आल्याने शेतकरी हतबल झाला होता शेतकऱ्यांनी तसे माहिती कृषी विभाग कडे केल्यानंतर डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथील किटकशास्र प्रमुख डॉ उंदीरवाडे व  पिक संरक्षण अधिकारी डॉ अजय सदावर्ते अकोला तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे कृषी सहायक जि डि धागे एस पि राजनकर पि डब्लु पेठे यांनी तळेगाव बाजार येथील शेतकरी दिलीप खारोडे, जना टापरे, सतिष खारोडे, यांचे शेतातील कपाशी पिकाची पाहणी केली व शेतकऱ्यांनी एक जुनं नंतरच कपाशी लागवड करुन कृषी विभाग चे सल्ला घेवुन फवारणी करावी सध्या कपाशी बोंड अळी आल्याने पिकांचे नुकसान होण्याची भिती आहे. शेतकऱ्यांनी कपाशी वर घरी तयार केलेले निंबोळी अर्क कोलोरेपाईसची फवारणी करावी असेही डॉ उंदीरवाडे यांनी सांगितले. यावेळी शेतकरी विठ्ठल निचळ, गोपाल अग्रवाल, विजय मानखैर, दादा पाटील उपस्थित होते.