*नांदुरा / प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यात चालू असलेल्या लॉक डाउन मुळे शेतकर्यांना मक्का विक्री साठी शासकिय् मक्का केंद्र सुरु करावी.अशी मागणी आमदार यांनी छगन् भुजबळ यांना निवेदनद्यारे केली तालुक्यातील शासकीय मका खरेदी केंद्र बंद झाली आहे .तरी तालुक्यातील व जिल्ह्यातील मका खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी आज दि. 13 जुलै रोजी आमदार राजेश एकडे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. छगन भुजबळ यांच्या कडे निवेदनाद्वारे केली.बुलढाणा जिल्ह्यातील मका खरेदी साठी नोंदणी केलेल्या 15,996 शेतकऱ्यांपैकी मात्र 2,084 शेतकऱ्यांचा मका 1,11,520 क्विटल खरेदी झाला आहे . दि. 12 जुलै पासून मका खरेदी बंद झाली आहे परंतु अद्यापही अनेक शेतकऱ्यांचा मका खरेदी करणे बाकी आहे.
मलकापूर तालुक्यातील 1,912 शेतकरऱ्यानी मका विक्री साठी नोंदणी केली असून फक्त 296 शेतकऱ्यांच्याच मका शासनाने खरेदी केला आहे. तर नांदुरा तालुक्यातील 1,856 शेतकऱ्यांनी मका विक्री साठी नोंदणी केली होती त्यापैकी केवळ 126 शेतकऱ्यांचाच मका शासनाने खरेदी केला आहे. मागील वर्षी चा खरीप व रब्बी हंगामा पूर्णतः वाया गेल्याने तसेच कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउन मुले शेतकरि हवालदिल् झाला आहे अशी मागणी आमदार राजेश एकडे यांनी छगन भुजबळ यांना निवेदनाद्वारे केली..


