हिवरखेड प्रतिनिधी@जितेश कारीया
प्रधानमंत्री आवास ग्रामीण अंतर्गत मधे समावेश नसलेल्या परंतु प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यासाठी ग्रामसभेने सुचविलेल्या नवीन कुटुंबाच्या संवर्ग निहाय याद्या प्रपत्र ड स्वरुपात विहित कालावधीत अंतिम करण्याबाबत निर्देशित आलेले होते. त्यानुसार तेल्हारा तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरु करून संकेतस्थळावर लाभार्थीची नोंद करण्यात आली होती. परंतु हिवरखेड हे गाव तालुक्यातील सर्वात मोठे असल्यामुळे हिवरखेड गावांमध्ये विहित कालावधीत सदर योजनेचे काम पूर्ण झाले नाही. तसेच लोकसभा, विधानसभा निवडणूक नंतर जिल्हा परिषद- पंचायत समितीच्या निवडणूकीसाठीची आचारसंहिता त्यानंतर कोविड १९ साठीचे लॉकडाउन या सर्व कारणांमुळे संकेत स्थळ सर्वेक्षण कामात अडथळा निर्माण झाला होता, त्यामुळे लाभार्थीची माहिती सदर संकेतस्थळावर टाकण्यासाठी अनेकाधिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यादरम्यान शासनाने संकेतस्थळ बंद केल्यामुळे त्यावर लाभार्थ्याची नोंद होऊ शकली नाही. करीता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत मधे समावेश नसणाऱ्या घराच्या ड सर्वेक्षणाबाबत तेल्हारा पंचायत समितीच्या उपसभापती सौ प्रतिभाताई सतीश इंगळे यांनी याबाबत गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन हिवरखेड सह इतरही बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये पात्र लाभार्थीचे सर्वेक्षणाचे काम अपूर्ण राहिले आहे त्यामुळे सदर या योजनेंअंतर्गत पात्र लाभार्थी वंचित राहू शकतात. याकरीता सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून प्लन प्लस आवास संकेतस्थळ सुरु करण्यात यावे, असे निवेदन दिले होते. तसेच याबाबत ग्रामविकास अधिकारी,हिवरखेड यांनी सुद्धा गटविकास अधिकारी यांना पत्राव्दारे कळविले होते. यावर कार्यवाही करीत गटविकास अधिकारी यांनी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,अकोला यांना या निवेदनाच्या व पत्राच्या अनुषंगाने या योजनेचे संकेतस्थळ सुरु करणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करणेसाठी कळविले आहे. या उपसभापती इंगळे यांच्या पाठपुराव्यामुळे या योजनाचा लाभ पात्र लाभार्थीना मिळण्याकरिता हिवरखेडसह इतरही ज्या गावात सदर योजनेचे काम पूर्णत्वास गेले नाही अश्या 'ड ' प्रतीक्षा यादीमधील लाभार्थी आशावादी झाले आहे. या योजनेचे संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर त्याचा लाभ तालुक्यातील चारशे ते पाचशे लाभार्थींना घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना याचा फायदा मिळणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. उपसभापती सौ.प्रतिभाताई इंगळे यांनी सामाजिक कार्यकर्ते, तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा संवाद चे संस्थापक श्यामशील भोपळे यांच्या मार्गदर्शनात या कामासाठी व तेल्हारा तालुक्यातील अनेक विकास कामासाठी घेत असलेल्या पुढाकाराबद्द्ल लाभार्थी व संवाद जॉबकार्डधारक यांच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
