शिवदास सोनोने
यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे व शासकीय नियमामुळे नागपंचमीचा पाच दिवसांचा कार्यक्रम व भंडारे रद्द करण्यात आले आहेत. केवळ आज नागपंचमी पाटीची हनुमान मंदिरात नेऊन पूजा करण्यात आली. नंतर गोरक्षनाथ महाराज मंदिरात नेऊन तिथे पूजा करण्यात आली. परत मुख्य जागेवर स्थानापन्न करण्यात आली. यंदाच्या नागपंचमीवर कोरोनाचे सावट दिसून आले. एरव्ही नागपंचमी म्हटले की उत्साह हा शिगेला असतो. पण यंदा निरुत्साह होता. कारण शनिवार, रविवार कडक लॉकडाऊन जाहीर असल्याने लोक घराबाहेरच पडले नाही. कालच पूजेचे साहित्य आणून ठेवले होते. त्याच्या साह्याने पूजा आटोपून घरातच हा सण साजरा करण्यात आला. वारूळाची पूजा झाली नाही की उंचच उंच जाणारे झोकेही फारसे कुठे दिसून आले नाहीत.
पाच दिवसांचा उत्सव, भंडारे रद्द

