Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लाठी-सोनापूर देशपांडे परिसरात झाडाझुडपांचे अतिक्रमण, संबंधित विभागाचे दुर्लक्ष

Responsive Ad Here
प्रतिनिधी @ विनोद पाल

इथे करावा लागतो जनतेला जीव मुठीत घेऊन प्रवास...

अति दुर्गम जंगलपरिसर असल्याने नेहमी वन्यप्राण्यांचा वावर,रस्त्याचे सुद्धा काम थंडबस्थ्यात

गोंडपीपरी/- तालुक्यातील बहुसंख्य गावे जंगल परिसरात मोडत असून कोठारी-लाठी-सोनापूर देशपांडे मार्ग सुद्धा घनदाट जंगलपरिसरातून जातो अशातच रस्त्याच्या दोनही बाजूला झाडेझुडपे एवढी वाढली आहे की,तिथून प्रवास करताना खूपच अडचणींचा सामना करावा लागत आहे.सोबतच मागील वर्षापासून रस्त्याचे मजबुतीकरण चालू आहे मात्र ते सुद्धा रखडलेले आहे.
एकीकडे संपूर्ण जगाला कोरोना या महाभयंकर रोगाने वेढले आहे.भारतात सुद्धा या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदीचे धोरण अवलंबण्यात आले.त्यामुळे शाळा,कॉलेज,हॉटेल बंद आहेत.यामुळे अनेकांना याचा फटका बसला आहे.सरकार कडून गरिबांच्या आणि शेतकऱ्यांचा खात्यात मदत म्हणून पैसे टाकल्या जात आहे परंतु हे पैसे काढण्यासाठी सोनापूर देशपांडे परिसरातील जनतेला घनदाट जंगलाचा सामना करीत 9 की.मी.अंतरावरील लाठी येथील बँकेत जावे लागते.लाठी येथे तलाठी कार्यालय,पोलीस स्टेशन, महाविद्यालय,कॉलेज,आठवडी बाजार असून परिसरातील जनतेला इथे यावेच लागते.परंतु रस्त्याची एवढी समस्या वाढली आहे का समोरचे दृश्य दिसतच नाही वेळोवेळी अपघाताची समस्या निर्माण होत असते.गेल्या वर्षभरात जंगली प्राण्याकडून माणसाचे बळी जाण्याचे प्रमाण वाढले आहे.या परिसरात सुद्धा जंगली प्राणी भरपूर आहेत रस्त्याच्या दोनही बाजू झाडाझुडपाणी वेढल्यामुळे तिथेच हे प्राणी मुक्त संचार करतात यामुळे परिसरातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी सदर रस्त्याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची साफसफाई करावी व रखडलेला रस्ता दुरुस्त करावा अशी परिसरातील जनतेकडून मागणी होत आहे.
 "लाठी येथे अति महत्वाचे कार्यालये,शाळा असून परिसरातील जनतेला,विद्यार्थ्यांना या रस्त्याने प्रवास करावा लागतो.परंतु हा रस्ता झाडाझुडपाणी वेढल्यामुळे जंगली जनावरांच्या संरक्षणासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे"  - विनोद पाल ग्रा.सदस्य सोनापूर देशपांडे