Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आलेगांव येथील २२३ नागरिकांनी करून घेतली रॅपिड टेस्ट.

Responsive Ad Here

पातूर तालुका  प्रतिनिधी  :दि १८ रोजी आलेगांव येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पातूर तालुका आरोग्य अधिकारी विजय जाधव यांच्या उपस्थितीमध्ये व मार्गदर्शनाखाली आलेगांव मळसुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील टीमने आलेगांव येथील २२३ नागरिकांची  रॅपिड टेस्ट घेतली असता.११ नागरिक पॉझिटिव्ह आले आहेत.
पातूर तालुक्यातील आलेगावातील दि १८ रोजी एका नागरिकाचा कोरोना आजाराचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गावामध्ये एकच खडबळ उडाली होती. पातूर तहशीलचे तहसीलदार दीपक बाजड यांच्या आदेशानुसार  वार्ड क्र २ व ३ मधील काही भाग दि १९ रोजी लोखंडी बॅरिकेट लावून रहदारी मुक्त करण्यात आला.सदर गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या अनुषंगाने पातूर तहसीलदार दीपक बाजड यांच्या मार्गदर्शनाखाली आलेगांव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पातूर तालुका आरोग्य अधिकारी विजय जाधव,व ग्रामपंचायत प्रशासनाचे पदाधिकारी सदस्य यांच्या बैठकीमध्ये दि २० रोजी रॅपिड टेस्ट घेण्याचे ठरवल्या नुसार दि २० रोजी आलेगांव येथील जिल्ह्या परिषद मराठी मुलांच्या शाळेमध्ये २२३ नागरकांनी स्वताहून रॅपिड टेस्ट करून घेतली असता सदर टेस्टमध्ये ११ नागरिकांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे आलेगांव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैदयकीय अधिकारी स्नेहा चव्हाण यांनी सांगितले.सदर टेस्ट आलेगांव मळसुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील टीमने केले आहे.११ नागरिक पॉझिटिव्ह निघाल्याने गावातील काही भागातील रस्ते रहदारी मुक्त होणार असल्याचे समजले.