खुलताबाद प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरु नये म्हणून अजुनही शाळा आणि महाविद्यालय सुरु झालेले नाहीत.बहुतांश विद्यार्थांना पाठ्यपुस्तके उपलब्ध झाले असले तरीशाळा व महाविद्यालय बंद असल्यामुळे शिकवण्यासाठी शिक्षक नाही.शासनाने ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग सुचवला असला तरी खुलताबाद शहर वगळता तालुक्यातील अन्य गावांत 4G नेटवर्क आभावी यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अटळ आहे.खुलताबाद तालुक्यातील खुलताबाद शहरसह वेरूळ, सुलतानपुर, गदाना,बाजारसावंगी, या सारखी मोठी गावांचा अपवाद सोडल्यास फोरजी 4G नेटवर्कची अडचन आहे. तालुक्यातील बहुतांश खेड्यात नेटवर्क जरी असला तरी ही 2G स्पीडने चालत आहे. ऑनलाइन शिक्षण घ्यायचे असेल तर अखंडितपणे 4G नेटवर्कची आवश्यकता असते. कोरोना विषाणुच्या पार्शवभूमीवर आजुन शाळा व महाविद्यालय सुरु झालेले नाहीत. व भविष्यात कधी सुरु होतील याची खात्री ही नाही. महाविद्यालय व शाळा सुरु झाले तरी ही पालक आपल्या मुलांना शाळा व महाविद्यालयात पाठवण्याच्या
मनस्तिथित ही नाहीत. परिणामी ऑनलाइन शिक्षणशिवाय तूर्त तरी पर्याय नाही."गूगल मिट, यूट्यूब, झूम ऍप, व अन्य ऑनलाइन वीडियोच्या माध्यमातून विद्यार्थी आपला अभ्यास करू शकतात. मात्र 4G नेटवर्क अनेकांची डोकादुखी चा कारण ठरत आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी 4G नेटवर्क उपलब्ध असले तरी ते अखंडितपणे चालु नसल्याचेही विद्यार्थी बोलत आहेत. विशेष म्हणजे खुलताबाद तालुक्यातील प्रत्येक गावात विविध कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क प्राप्त असले तरी 4G नेटवर्क अपवादानेच पहायला मिळत आहे.एखाद्या कंपनीचे 4G नेटवर्क असले तरी ते अखंडितपणे चालत नाही. त्यामुळे विद्यर्थियांना शिक्वायला गुरूजी तर नाहीच आणि फोरजी पण नाही. अशी अवस्था निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे. मोठ्या शहरांमध्ये स्मार्ट स्टडीजच्या नावावर ऑनलाईन शिकणे खूप लोकप्रिय आहे.फोरझी नेटवर्कची कोणतीही समस्या नसल्यामुळे शहरांमधील विद्यार्थीही याचा फायदा घेतआहेत. तसेच ग्रामीण भागातील पालकांनी ऑनलाइन शिक्षणासाठी ऐपत नस्तानाही अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिले आहेत.प्रत्येक महिन्यात 150 ते 300 रूपये रिचार्जसाठी खर्चही पालक करत आहे. मात्र नेटवर्कच्या समस्यामुळे पालक आणि विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
