गणेश पांढरे प्रतिनिधी जळगाव
आज १जुलै म्हणजेच राष्ट्रीय डाॅक्टर दिन निमीत्त चोपडा शहर व तालुका काँग्रेस च्या वतीने डाॅक्टरांचा सत्कार करण्यात आला. चोपड्याचा कोवीड सेंटर मध्ये सेवा देणारे डाॅ.मनोज पाटील यांचा शाल, पुष्पहार व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना महामारी च्या काळात,स्वता:चा जीव धोक्यात घालून रूग्नांची सेवा करणार्या सर्व डाॅक्टरांचा हा प्रातीनिधीक स्वरूपाचा सत्कार आहे अशी भावना चोपडा
शहर काँग्रेस अध्यक्ष श्री के.डी.चौधरी (सर) यांनी व्यक्त केली.डाॅक्टर म्हणजे परमेश्वराचेच रूप आहे, तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व डाॅक्टरांना राष्ट्रीय डाॅक्टर्स दिना निमीत्त चोपडा शहर व तालुका काँग्रेस तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

