शिवदास सोनोने प्रतिनिधी जिल्हा बुलढाणा
बुलडाणा सध्या भर वस्तीत असलेल्या अत्यविधी, दफनविधीच्या ठिकाणी कोरोनाग्रस्त मृतदेहाची अत्यविधी व दफनविधी केल्या जात असल्याने भविष्यात परिसरातील नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची भीती व्यक्त करीत कोरोनाग्रस्त मृतदेहाची अत्यविधी व दफनविधीसाठी वस्ती नसलेल्या शासकीय भूखंडावर व्यवस्था करावी अशी विनंती वजा मागणी बुलडाण्याचे नगरसेविका पती तथा समाजसेवक मोहम्मद अजहर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत कोरोना रोकने तक्रार निवारण समितीच्या नोडल अधिकारी यांच्याजवळ केली आहे. दिलेल्या अर्जामध्ये नमूद केले आहे.22 जून रोजी बेजबाबदार पणे जोहर नगरमधील स्मशानभूमित बेजबाबदारपणे रात्रीच्या वेळी कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृतदेह आणण्यात आला.यावेळी प्रोटोकॉल प्रमाणे
अत्यविधी करण्यात येणार नसल्याने नागरिकांनी परिसरात तणावपूर्ण वातावरण तयार केला होता.यावेळी मी आणि माझे सहकारी घटनास्थळी जावून सर्वांची समजूत काढून अत्यविधी पार पडायला लावले.पुन्हा 30 जून रोजी कोरोनाग्रस्त मृतदेहाचे जोहर नगरमधील स्मशानभूमित अत्यविधीकरण्यात आले यावेळी मात्र जबाबदारीने सर्व कार्य पार पडले.मात्र अशाच प्रकारे कोरोनाग्रस्त मृतदेहांचे अत्यविधी व दफनविधी वस्ती असलेल्या ठिकाणी झाल्याच भविष्यात या वस्तीतील नागरिकांना कोरोनाची लागण असल्याची भीती व्यक्त करीत वस्ती नसलेल्या शासकीय खुल्या भूखंडावर अत्यविधी व दफनविधी करण्यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी नगरसेविका पती तथा समाजसेवक मोहम्मद अजहर, मोहम्मद दानिश, जुनेद चौधरी,इमरान चौधरी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी पुरी यांच्याकडे एका अर्जाद्वारे केली आहे.

