खुलताबाद प्रतिनिधी
खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे व परिसरात मकावर लष्करी अळीचा प्रदुर्भाव झाला आहे. व पावसाच्या उघडीपीनंतर मात्र मका कोळपणीला वेग आला आहे तर युरिया खताची शेतकऱ्यांना गरज असताना खत गायब आहे. व त्या सोबत पथक, कृषीधिकारी, विस्ताराधिकिरी ही गायब असल्याचे चित्र आहे. जोरदार दमदार पावसामुळे खरिप पिके जबरदस्त असुण जोरदार वाढ होत आहे. त्यात मका पिकावर लष्करी अळीचे प्रदुर्भाव झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. गतवर्षी लष्करी अळीने मोठे नुकसान केले होते. यंदा ना ना म्हणता याहीवर्षीलष्करी अळीने आगमान करून शेतकऱ्यांची झोप उडवून दिली आहे. 2 दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने निंदणी, खते टाकणे, मका
कोळपणीला वेग आला आहे. गत 22 जुन पासुन येथे व परिसरात कमीअधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता. पाऊस उघताच शेतकरी, शेतमजुर शेतीकामात गुंतला असल्याने गाव बाजारपेठात शुक शुकाट आहे. युरिया खताची गरज असताना बाजारपेठेतून युरिया गायब झाला आहे. शेतकरी म्हणतो कृषी दुकानदार म्हणतो युरिया संपला आहे. शेतकरी म्हणतो गोडावूनला युरिया चा साठा आहे. दोघात मतभेद आहेत तर मर्जीतील लोकांना खते वटप केल्या जात आहे, तर ज्यांनी बियाणे, औषधी घेतले अशा ग्राहकांना ही दुकानदार युरिया खते देत असल्याचे आरोप शेतकऱ्यांनी लावलाआहे. तर त्यात खरिप पिक हंगाम च्या सुरवातीला तयार केलेले जिल्हा, तालुका पथके, तालुका कृषी अधिकारी, विस्ताराधिकिरी, हेही गायब आहे. काही शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे वाढीव दराची तक्रारही केली आहे. वाढीव दर, युरिया गायब यामुळे खरिप पिक हंगाम दरम्यान बाजारपेठेत निव्वळ गोंधळ माजला आहे. शेतकऱ्यांच्या साठी फशरक्या मारणार आता गायब आहे. मकावर लष्करी अळीचा प्रदुर्भाव, युरियांचे वाढीव दर, युरिया गायब, पथक, अधिकारी गायब. वरिष्ठांनी याकडे लक्ष घालून बाजारपेठेत होत असलेला प्रकार थांबवावा असी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
