पातुर ता.प्रतिनिधी/मुकेश हातोले
वाढती पाणी टंचाई खुप मोठ्याप्रमाणात होत असलेली वृक्षतोड आज पुर्ण देशात खुप जास्त आपण पाहत असालच की मागिल वर्षी खुप मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई ला सामोरे जावे लागले होते त्यांचे कारण कुठं तरी वृक्षतोड हे आहे.
त्यामध्येच आज गेल्या ४ ते ५ महिन्यापासुन आपल्या संपुर्ण देशात कोरोना या महामारीने थैमान मांडले आहे आपला अकोला जिल्हा सुध्दा या कोरोना या विषाणुच्या प्रसारामुळे फार मोठ्या प्रमाणात ग्रस्त झालेला आहे या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.सतीश देवराव हातोले यांनी "झाडे लावा झाडे जगवा" हा नवीन उपक्रम हाती घेऊन आपल्या अकोल्या जिल्हा मध्ये संघटनेच्या सर्व कार्यक्रर्त्यांच्या वतीने पुर्ण जिल्हा मध्ये कमीत कमीत ५००० झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरवुन त्या उपक्रमास सुरुवात करुन झाली आहे चौंढी, पातुर,बाळापुर,मुर्तिजापूर, मांडवा, तुलंगा,सातरगाव,निमखेळ , रिधोरा,,निंबाफाटा व दिनांक २६जुलै रोजी निमखेळ येथे पातुर तालुका सचिव मा.मंगेशभाऊ हातोले यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण करण्यात आले व सातरगाव येथे मा.विनोदभाऊ सुर्वे बाळापुर ता.सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण करण्यात आले व विविध प्रकारचे झाडे लावुन वृक्षारोपण करण्यात आले प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले मा.मंगेशभाऊ हातोले(पातुर ता.सचिव) उत्तम गोळे,संदिप हातोले, नितेश हातोले, मा.विनोदभाऊ सुर्वे(बाळापूर ता.सरचिटणीस)मा.सतिष वाकोडे, अनिल वाकोडे, मनोज इंगळे,विश्वजित वाकोडे, भारतभाऊ सुर्वे(भिम शक्ती नवयुग मंडळ सातरगाव)देवानंद सुर्वे,मा.पैलवान राहुलभाऊ सुर्वे कार्यकर्ते उपस्थित होते.अशाप्रकारे एक दिवसात ग्रामीण युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत वृक्षारोपन करणे सुरू आहे..

