नयन खरात प्रतिनिधी मेहकर
२ जुलै २० जगात थैमान घालुन बसलेल्या कोरोणाचा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर विवीध उपाय योजना चालु आहेत लॉक डाऊन पुन्हा वाढवण्यात आला असुन मेहकर शहरातील दुकाने सकाळी ९ ते दुपारी ३ वाजे पर्यंन्त चालु ठेवण्याचे व विना मास्क फिरने ,सोशल डिस्टन्स न राखने ,विना कारण रस्त्यावर वाहन घेउन फिरणे ,नियमांचे उल्लघन करणा-या वर कडक कारवाईचे आदेश उपविभागीय
अधिकारी गणेश राठोड यांनी दिले आहे याच अनुशंगाने पोलीस प्रशासन,नगरपरिषद प्रशासन,महसुल प्रशासन यांच्या वतिने काल शहरातील प्रमुख मार्गावरून रुट मार्ट काढण्यात आला व मास्क वापरा कोरोणा टाळा, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडु नका असे सांगण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश राठोड,उपविभागीय पोलीस अधिकारी तडवी, तहसिलदार डॉ संजय गरकळ, नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन गाडे, ठानेदार आत्माराम प्रधान व नगरपरिषद ,पोलीस,महसुल प्रशासनाचे कर्मचारी होते.
