खुलताबाद प्रतिनिधी
खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथील धांड नदीला सलग चारपाच पूर पाणी गेल्याने खुलताबादकरांना पुन्हा नदी प्रकल्प जोडची आठवण झाली असुण धांड नदी - गिरिजा प्रकल्प जोडणी प्रश्न गत पंधरा वीस वर्षा पासून रेंगाळून असूण धांड नदीचा पूरपाणी सद्या याही वर्षी वाया जात आहे. व खुलताबादकरांना ते पूरपाणी गिरिजा प्रकल्पात हवे असल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. तालुक्यातील बाजार सावंगी येथील धांड नदी ही गिरिजा प्रकल्पासी जोडण्याची प्रक्रिया गत १५ - २० पासून सुरू आहे. अनेक वेळा सर्वे, मोजणी चर्चा, बातम्या, निवडणुकीत मुद्दा अनेकानेक चर्चेत आहे. परंतु प्रत्यक्षात काम होत नसल्याने नागरिकांतून मोठी
नाराजी आहे. हा मुद्दा विशेष करून निवडणुकीत खुप गाजतो व तद्नंतर उन्हाळ्यात पाणी टंचाई व पावसाळ्यात पूरपाणी वाया गेले की हा मुद्दा ऐरणीवर येतो. हे विशेष. सद्या पावसाळ्यात बाजारसावंगी च्या धांड नदीला सलग चारपाच पूर पाणी दुथडी भरून गेल्याने खुलताबाद चे नागरिक जागृत झाले आहेत. कारण धांड नदीच्या चारपाच पूर पाण्यात गिरिजा प्रकल्प अर्धा भरला असता. परंतू नदी व प्रकल्प जोडणी न झाल्याने ते सर्व पाणी वाया गेले. व जाणार. सावंगी नदीला पूर पाण्याची बातमी झळकताच खुलताबादकर जागृत होऊन नदी व प्रकल्प जोडणीचाच विषय काढून चर्चा करतात. परंतु दोन आमदाराच्या २० - २५ वर्ष व काळात ते धांड नदी गिरिजा प्रकल्प जोडणी प्रक्रिया पूर्ण झाली नाही. व होईल की नाही. हेही सांगता येत नसल्याने खुलताबादकर नागरिक खुप नाराज आहे. तातडीने धांड नदी व गिरिजा प्रकल्प जोडणीची प्रक्रिया हाती घेवून जोडणी करावी असी मागणी आहे.
