शिर्डी प्रतिनिधी:
शिर्डीतील एका नामांकित व्यक्तीला कोरोना ची बाधा झाली असून त्यांच्या संबंधातील सहा जणांचे अहवाल प्रतीक्षेत....!! बाधित व्यक्ती चार दिवसापासून नाशिक येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांचा अहवाल काल रात्री कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शिर्डी शहरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे मास्क सॅनिटायझर यांचा उपयोग करावा विनाकारण घराबाहेर पडू नये असा सल्ला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गागरे यांनी दिली.