Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दरवर्षीप्रमाणे याहिवर्षी पारस येथील सुशिक्षित बेरोजगारांना औष्णिक विद्युत केंद्र पारस येथे कंत्राटी कामगार स्वरुपाचे काम द्या:- मा सतीश देवराव हातोले (संस्थापक/अध्यक्ष)

Responsive Ad Here

प्रतिनिधी / नरेंद्र इंगळे ,बाळापूर
आज पुर्ण देशामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहुन आज पुन्हा एकदा महाराष्ट्र मधील काही भागांमध्ये पुर्णपणे लाँगडाऊन लागलेला आहे यामुळे खुप जनांना आपला रोजगार  सुध्दा गमवावा लागला आहे. आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ग्रामीण भागातील युवा तरुण पुणे, मुंबई, सुरत व इतर ठिकाणी रोजगार मिळवण्यासाठी जात असत पण या कोरोना महामारीमुळे आज सर्वांना आपल्या आपल्या गावी परतावं लागलं आहे. 
पारस येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण दरवर्षी औष्णिक विद्युत केंद्र पारस येथे ४ (चार) महिन्याच्या कंत्राटी स्वरुपात काम करत असत पण या वर्षी औष्णिक विद्युत केंद्र पारस येथील प्रशासनानं दरवर्षी जे कंत्राटी कामगार स्वरुपाचे काम जे मुळनिवासी पारस येथील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार  मिळायचा तो रोजगार या वर्षी जुन महिना संपला तरीही कंत्राटी पद्धतीने होणारी ४ महीन्याची भरती अजुन सुध्दा केली नाहि त्यामुळे पारस येथील युवा तरुणांवर उपासमारीची  वेळ आली आहे या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.सतीश देवराव हातोले यांनी मुख्य अभियंता (निर्मिती) म.रा.वि.निर्मिती.कं.मर्या.(महाजनको) औ.वि.केंद्र पारस, महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली व या विषयाकडे ऊर्जामंत्री मा.नितिन राऊत साहेब यांनी सुध्दा या विषयांची चौकशी करुन औष्णिक विद्युत केंद्र पारस मध्ये चार ते पाच महिन्यांच्या कालावधी साठी कंत्राटी कामगार म्हणून पारस येथील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना लवकरात लवकर रोजगार उपलब्ध करून  द्यावा अशी माणगी ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा महाराष्ट्र राज्य च्या वतीने करण्यात आली.