Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नाशिक दशनाम गोसावी समाज समाधी बचाव समितीची सिडको समाधीभूमी बाबत नगरसेवकांच्या सोबत चर्चा.

Responsive Ad Here

योगेश गोसावी @ प्रतिनिधी नाशिक


शनिवार दि.२५|०७|२० रोजी दशनाम गोसावी समाधी बचाव समिती,महाराष्ट्र नाशिक शहर व सिडको कार्यकारिणी पदाधिकारी /सभासद यांनी मा.सुधाकर ( भाऊ) बडगुजर साहेब (नगरसेवक) सिडको ,नाशिक  यांच्या सोबत (सिडको समाधीभूमी बाबतजागा व समाधी  बांधणीबात) महत्तवाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सर्व ऊपस्थित झाले होते.तसेच यावेळी लिंगायत समाजातील पदाधिकारी/सभासद देखील ऊपस्थित होते. समाधीभूमी व समाधी बांधणीबात याविषयांवर चर्चा दोन्ही समाजबांधवानी एकमेकांच्या सोबत चर्चा  केली.खालील विषय/ चर्चा यांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आदेश मा.बडगुजर साहेब यांनी 
म.न.पा चे मा.शिंदे साहेब ( अभियंता) यांना देण्यात आले. 
🟤एकुण समाधीभूमीसाठी  असलेली जागा यांचे वाटप समाधीभूमी करीता सारख्याच पध्दतीने दोन्ही समाजासाठी  करण्यात येईल.
🟤समाधीभूमी ची जागा दोन्ही समाजासाठी निश्चित नियमाप्रमाणे मोजमाप करून मध्यभागी भिंत ऊभी करण्यात येईल.
🟤दोन्ही समाजबांधवानी एकमेकांमध्ये कुठलाही प्रकारचा समाजात वाद  तिरस्कार किंवा समाजबांधवाच्या भावना दुखावल्या जातील याप्रकारचे कुठलेही वर्तन निर्माण करू नये.
🟤समाधीभूमी परिसरातील स्वच्छता व कम्पाऊंड करणे.
🟤बैठक व्यवस्था व पिण्याच्या व वापराचे पाण्याची सोय करणे.
🟤समाधीभूमी परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तू व ऊपकरणे यांची दुरूस्ती करणे.
वरील महत्तवाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी 
दशनाम गोसावी समाज समाधी बचाव समिती नाशिकचे पदाधिकारी ,

मा. भाऊसाहेब भारती (नाशिक शहर अध्यक्ष) , मा. बाळासाहेब गोसावी ( उपाध्यक्ष), मा. योगेश गोसावी (जनसंपर्क व प्रसिद्धी प्रमुख)
  यावेळी सिडको कार्यकारिणी चे पदाधिकारी मा.बाळासाहेब गोसावी (अध्यक्ष),मा.गजानन गोसावी (उपाध्यक्ष), मा.डाॅ.झेड.आर.भारती(उपाध्यक्ष), मा.योगेश गोसावी (सचिव), मा.प्रसाद गोसावी (ऊपसचिव), मा.धनंजय गोसावी (खजिनदार), सदस्य मा.मनोहर गोसावी ,मा.लोटन गोसावी, मा.भरत गोसावी, मा.सुनील गोसावी , मा.कैलास गोसावी, मा.मोहन गोसावी, मा.कृष्णा गोसावी , मा.किरण गोसावी , मा.भरत निंबा गोसावी(पत्रकार) , मा.जितेंद्र गोसावी वरील सर्व सिडको कार्यकारिणी पदाधिकारी व सभासद ऊपस्थित  होते.