Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नाशिक येथील गुरू गोविंद स्कूलचा मनमानी कारभार पालकांकडून फि ची सक्ती व लूट विभागीय शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याकडे तक्रार.

Responsive Ad Here

योगेश गोसावी@  प्रतिनिधी नाशिक


सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव नाशिक मध्ये दिवसेंदिवस वाढत आहे सुमारे तीन  महिन्यापासून रोजगार व सर्व कामकाज बंद असल्याने ऊपासमारीची वेळ आली आहे.मात्र काही शिक्षण संस्थाचालकांचा मनमानी कारभार मात्र सुरूच आहे.ईंदिरानगर 
वडाळा पाथर्डी रोड येथील गुरू गोविंद सिंग या शाळेत 
पालकवर्गाकडून अतिरिक्त फी  ची मागणी केली जात आहे.

संस्था चालकांनी शाळा प्रवेशासाठी दारोदार भटकणाऱ्या पालकांच्या असहाय्यतेचा गैर फायदा घेवून महाराष्ट्र शासनाच्या “शालेय संस्था देणगी विरोधी कायदा (कँपिटेशन फी प्रतिबंध कायदा )१९८७ च्या सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे.
या शाळेत शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी प्रवेशाकरीता लागणारी पुस्तके ,वह्या  व्यवस्थापनाने / शाळेने ठरवून दिलेल्या विशिष्ट पुरवठादार ज्योती स्टोअर्स यांच्या कडून घेण्यास भाग पाडत आहे .शाळेने एक पत्रक देखील पालकांना पाठवले आहे .विक्री झालेल्या पुस्तके ,वह्या पावतीवर शाळेचे नाव गुरुगोबिंदसिंग पब्लिक स्कूल असे आहे . शैक्षणिक साहित्य हे शहरात कुठेही उपलब्ध होऊ दिले जात नाही असे प्रकाशन करून शाळेने मनोपली करून ठेवली आहे .त्यामुळे पालकांना  त्याच ठिकाणाहून शैक्षणिक साहित्य घेणे सक्ती चे केले जात आहे.
दि.११ जून २००४ शासन निर्णया क्रमांक (GR. 20040726132812001-0500) यास केराची टोपली दाखवली आहे .
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी खाजगी शिक्षण संस्थाचालकांना त्यांच्याच शाळेतून विद्यार्थ्यांना लागणारी वह्या पुस्तके गणवेश इ. साहित्य खरेदीची पालकांना सक्ती करता येत नाही तशी केल्यास शिक्षण अधिकार्यांनी तत्काळ संबधित संस्थाचाकांवर गुन्हे दाखल करावे असे आदेश असताना काल दि.१५/६/२०२० रोजी आपल्या शाळेत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी  दिलेल्या आदेशाला धाब्यावर बसवत राजरोसपणे मनमानी कारभार  सुरु आहे.आर्थिक गैरव्यवहारातील पालकांच्या शालेय फी द्वारे नफेखोरी रक्कम व वसूल केलेली कँपिटेशन फी व बिल्डींग फंड पालकांना परत करण्यात यावा.नियमबाह्य ट्युशन फी, कँपिटेशन फी, बिल्डींग फंड घेणाऱ्या शाळेस नियमाप्रमाणे १० लाख रुपये दंड व संचालक ट्रस्टी मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात यावा तसेच हा अपराध करणाऱ्या अपराधी संचालक मंडळ ,प्रशासन यांना कारावासेची शिक्षा प्रस्तावित करण्यात यावी.अन्यथा या विरोधात आपले कार्यालयावर मोर्चा ,निदर्शने ,धरणे ,घेराव व ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा ईशारा शिवसेना विभागप्रमुख निलेश साळुंखे शिवसेना विभाग प्रमुख सुयश पाटील शाखाप्रमुख आकाश काळे शाखाप्रमुख निखिल मेहंदळे यांनी दिला.

व्हिडिओ बघा