दत्ता जाधव @ प्रतिनिधी औरंगाबाद
लॉकडाउनदरम्यान वाळूज येथील सर्व उद्योगही बंद ठेवले जणार आहेत. या बंददरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवेबाबतचे सर्व निर्णय पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त स्वतंत्रपणे जाहीर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली आहे. विभागीय आयुक्तांसमवेत लोकप्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात
आला. या बैठकीस खासदार इम्तियाज जलील यांची मात्र अनुपस्थिती होती. दरम्यान औरंगाबाद शहरात मंगळवारी १५० रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ६८८० एवढी झाली असून सध्या ३३७४ रुग्णांवर उपाचार सुरू आहेत.

