Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वीज बिल माफी करिता उर्जा मंत्री, महाराष्ट्र सरकार, मुंबई यांना वीज बिल विरोधी विचार मंच यांचे निवेदन

Responsive Ad Here
राजू कलाने  अमरावती प्रतिनिधी

अमरावती मुख्य अभियंता, महावितरण कार्यालय, विद्युत भवन, शिवाजी नगर, कँम्प,अमरावती यांच्या मार्फत सादर मागण्या करण्यात आल्यात मागण्या 
1) लाॅकडाऊन च्या काळातील तीन महिन्यांचे वीज बील पुर्णपणे माफ करणे.
2) महाराष्ट्रातील सर्व वीज कंपन्यांचे सोशल आँडीट करणे व बोगस वीज बील मधील झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषींवर कडक कार्यवाही करणे.
3) जुलै 2020 पासुन दर महिन्याला 200 युनिट पर्यंत मोफत वीज देणे.
कोरोना आणि त्यामुळे लागलेल्या लाॅकडाऊन मुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेचा फटका सर्व सामान्य जनतेला बसलेला आहे. हजारों लोकांनी आपला रोजगार गमावल्याने त्यांच्यासमोर उपासमारीची पाळी आली आहे. अश्यातच बोगस वीजेचे बील लोकांच्या मस्तकी मारण्याचे काम वीज

कंपन्या करत आहेत. ग्राहकांना अवाजवी बील आकारुन वीज कंपनीत भोंगळ कारभार सुरु आहे हे स्पष्ट दिसते. अनेक वीज ग्राहक आपल्या तक्रारी घेवुन अनेक भागात कार्यालयाच्या ठिकाणी वीज देयके बद्दल तक्रारी देत असल्याने ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याने कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.राज्यात विज निर्मीती,पारेषण,वितरण करणा-या कंपन्यांना त्यांचे "विजदर" महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडुन मंजुर करुन घ्यावे लागतात. त्यासाठी विज कंपन्यांना या आयोगाकडे पुढील वर्षाचे अंदाजीत नफातोटा पत्रक, ताळेबंद इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागतात. त्या कागदपत्राच्या आधारावरच आयोगकडुन विजदर मंजुरीची पुढील प्रक्रीया पार पाडली जाते आणी विजदर ठरविले जातात. परंतू त्यानंतर त्यानुसार पुढे होणा-या आर्थिक व्यवहारांचे प्रत्यक्ष "अंकेक्षण" कींवा पडताळणी करण्याची यंत्रणा मात्र आयोगाकडे नाही. विज निर्मीती केंद्राचे "भ्रष्ट्राचारी अधिकारी" याचाच गैरफायदा घेत असुन ते विजनिर्मीती

केंद्राचा संचालन, देखभाल आणी दुरुस्तीचा खर्च महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे "प्रचंड फूगवुन" सादर करीत असतात. या फुगविलेल्या खर्चामध्ये भ्रष्ट्राचारासाठी फुगवुन काढल्या जाणा-या "बोगस" कंत्राटाचा समावेश असुन भ्रष्ट्राचाराची कुरणे ठरलेल्या येथील "बोगस" वीज कंपन्यांचा प्रचंड भार "वाढीव" विजबिलाच्या रुपाने राज्यातील जनतेवर पडत आहे. दर महीन्याला जनतेला "विजबिल" नाही तर येथील भ्रष्ट्राचाराचा "भुर्दंडच" भरावा लागत आहे. म्हणुन विश्वासाहर्ता आणि पारदर्शिपणा येण्यासाठी सर्व वीज कंपन्यांचे सोशल आँडीट होणे अत्यंत गरजेचे आहे. चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे भ्रष्ट्राचारावर अंकुश लावता येईल.
दिल्ली मध्ये वीज तयार होत नसुन सुद्धा महाराष्ट्रपेक्षा दिल्लीत वीजेचे दर खुपच कमी आहे. दिल्ली सरकारने 200 युनिट पर्यंतचे वीज दर पुर्णपणे माफ केले आहे आणि 200 ते 500 युनिट पर्यंतचे वीज दर निम्मे केलेले आहे. याउलट महाराष्ट्रात वीज निर्मीती होत असुन सुद्धा वीजेचे दर प्रत्येक वर्षी वाढतचं आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे. म्हणुन दिल्ली सरकार प्रमाणे महाराष्ट्रातही 200 युनिट पर्यंत ग्राहकांना वीज मोफत देता येणे शक्य आहे.वरील विवेचनावरुन हे स्पष्ट होते की जर सरकारची नियत जर साफ असेल तर काहीही शक्य होवु शकते. महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देता येवु शकतो.म्हणुन आपणास विनंती आहे की वरील मागण्या त्वरित मान्य कराव्या. आणि आपण जर या मागण्या 8 दिवसाच्या आत 

मान्य केल्या नाही तर भ्रष्ट वीज कंपन्या व महाराष्ट्र सरकार विरुद्ध संवैधानिक मार्गाने जनतेला रस्त्यावर उतरुन आक्रामक आंदोलन करावे लागेल. होणा-या पुढील परिणामांसाठी महाराष्ट्र सरकार पुर्णपणे जबाबदार राहील.किरण गुडधे, धनंजय देशमुख, खालिद, विशाल चव्हाण, डॉ. अलिम पटेल, सिद्धार्थ गायकवाड़, मिलींद दामोधरे, संगिता वाघ, माया माहुलकर, रंजना मामर्डे, प्रशांत मेश्राम, निलेश गवळी, शिव परिवाले, आकाश गवळी, मनिष वडाने, अतुल इंगळे, सुमेध बनसोड, ईजाज खान, मुजिब खान त्रंबक वानखेड़े, बाबाराव पाळणकर, राजीव खाडे, कृष्णा, अनुप राहाटे, अंकीत ठाकरे, अतुल बोंडे, योगेश खारकर, सुधिर हांडे , सचिन मेश्राम, अनुप दातेराव, मंगेश वाहाणे, संतोष भालेराव, किशोर, किशोर वानखडे, तसेच अमरावती शहर व संपूर्ण जिल्ह्यातून वीज बिल विरोधी विचार मंच चे सभासद यावेळी सहभागी झाले होते.