Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

खुलताबाद परिसरातील पुलांचे कामे युद्धपातळीवर सुरू मात्र पुरामुळे घबराट

Responsive Ad Here
खुलताबाद प्रतिनिधी 

खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे व परिसरातील संथ गतीने व चालढकल करत सुरू असलेले पुल कामे पावसाने केलेल्या फटके बाजी व तद्नंतर आलेल्या महापुरामुळे ठेकेदार  व प्रशासनात प्रचंड घबराट पसरली असुण महापुरा नंतर पुलांचे कामे युद्धपातळीवर सुरू असल्याचे चित्र आहे.गेल्या दिड ते दोन वर्षांपासून खुलताबाद ते बाजारसावंगी येथे व परिसरात कोटी रूपयांचे सहासात पुलांचे कामे सुरू आहेत. यात लोणी - चिकलठाणा या रस्त्यावरील दोन  पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर रहादारीसाठी खुला करण्यात आला आहे. बाजार सावंगी येथे दवाखाना काॅलनी येथे एका पूलाचे काम पुर्ण होवून वाहतुकी साठी खुला झाला आहे. यात तीसगाव - चिकलठाणा या रस्त्यावरील पुलाचे काम रखडले आहे. स्लॅब अभावी पुल अपुर्ण स्थितीत पडून आहे. फुलंब्री - बाजारसावंगी ते खुलताबादच्या  मुख्य रस्त्यावरील शेलगाव गिरिजा नदीवरील पुल काम व बाजार सावंगी येथील बोडखा - धांड नदीवरील


पुल व गुरांचा बाजार पेठ व इंदापूर फाटा नदीवरील पुल या पुलांचे काम मध्यांतरी खुप रेंगाळली होती. या संदर्भात तक्रार व बातम्या ही झळकल्या होत्या. तरी ही संथ गतीने व चालढकलचा प्रकार सुरु होता. यात येथे व परिसरात 22 जुन पासून पावसाने जोरदार व दमदार हजेरी लावत पाणीचपाणी केले. तर जोरदार सततधार पावसाने दाणादाण उडाली होती. यात जोरदार पावसामुळे सर्वच नाले नद्यांना मोठा पुर पाणी आले होते. त्यात पुलाच्य ठिकाणी माती मलबा केरकचरा पडुन असल्याने पुरपाणी निघणे मुश्किल होते त्यामुळे पुराने पुलाला चांगलाच दणका दिला. व जरका बाजार सावंगीत निम, रेल, पाडळी व बोडखा नद्यांन एकच वेळा पुर आले असते तर पुलाचे नुकसान झाले असते तिच स्थिती शेलगाव गिरीजा नदीवरील पुलांची होती. परंतु पुरापाण्याने बाजुने मार्ग काढून पुलांना जीवदान दिले. त्यामुळे ठेकेदार व प्रशासनात एकच खळबळ उडाली व संथ गतीने सुरू असलेले पुल काम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. यामुळे नागरिकही अचंबित- आवक झाले आहे. की तक्रार करून बातम्या झळकून जे काम तातडीने होत नव्हते तेच काम पुरापाण्याने एका दणक्यात मार्गी लावले आहे.