हिवरखेड प्रतिनिधी@जितेश कारीया
हिवरखेड आणि जवळच्या बादखेड, (सौन्दळा) येथे कोरोना चे पहिले पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
हिवरखेड येथील वार्ड क्रमांक चार मधील अंदाजे 70 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव निघाली आहे. प्रशासन, ग्रामपंचायत सदस्य गण, ग्राम विकास अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, इत्यादी सर्व विभागाच्या माध्यमातून संबंधित परिसर सील करण्याची प्रक्रिया करण्यात आली. सदर महिला काही दिवसांपूर्वी अकोला येथे उपचारासाठी भरती असल्याची माहिती मिळाली आहे. अकोला उपचारादरम्यान सदर महिला कोरोना बाधित झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.हिवरखेड नजीक असलेल्या बादखेड सौंदळा येथील एक युवक सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. "कोरोना को हराना है" या व्हाट्सअप च्या ग्रुपमध्ये सर्व जागरूक नागरिक अधिकारी प्रशासनाचा समावेश असून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यामुळे हिवरखेड मध्ये कोरोनाचा शिरकाव होण्यापासून रोखता आले होते. परंतु उशिरा का होईना दुर्दैवाने कोरोनाने हिवरखेड आणि बादखेड मध्ये धडक दिली आहे. त्यामुळे आतातरी सर्वांनी घरातच राहावे सुरक्षित राहावे जेणेकरून "कोरोना को हराना है" हे ध्येय पुन्हा साध्य करता येईल असे आवाहन ग्रुपमधील सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

