Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एक दिवसाच्या वर बि.एस.एन.एल नेटवर्क बंद असल्यास रिचार्ज ची मुदत (validity) वाढवून द्या. मागणी

Responsive Ad Here
प्रतिनिधी@मुकेश हातोले

गेल्या काही महिन्यांपासून जगात (कोविड 19)कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. त्यात भारतामधे लॉकडाऊनमुळे गरीब जनतेला उद्भवनाऱ्या समस्या,ह्या परिस्थितीमधे अकोला जिल्ह्यातील गोरेगाव बु!!,गोरेगाव खुर्द!!,माझोड भरतपूर व नजीकच्या सर्व गावांतील लोकांना बि.एस.एन. एल च्या निष्काळजी व बेजबाबदारपणामुळे अत्यंत बिकट समस्यांना सामोरे जावे लागत आहे.जसे मोबाईल चे नेटवर्क बंद असणे, बँकांमधील कनेक्टिव्हिटी बंद असणे, सेतू व इंटरनेट कँफे बंद असणे, आठ आठ दिवस मोबाईलला नेटवर्क नसणे इत्यादी.वारंवार तक्रारी करूनही त्यात कोणताही बदल होत नाही आहे.हे लक्षात घेता गोरेगाव नजिकच्या सर्व गावांतील लोक आक्रमक झाले आहेत. ह्या समस्यांचे निवारण लवकरात लवकर बि.एस.एन.एल मुख्य कार्यालय अकोला यांनी करावं यासाठी मंगळवार सात तारखेला संघदिप शेगांवकर यांच्या नेत्रूत्वात जि.एम.साहेब,बि.एस.एन.एल मुख्य कार्यालय अकोला यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.प्रसंगी दिनेश शेगांवकर,कुलदीप शेगांवकर,अमोल शेगांवकर(फोटोग्राफर), गौतम शेगांवकर,प्रवीण शेगांवकर,रोशन शेगांवकर,आकाश बशीरे,गौरव गोपनारायण आदी उपस्थित होते. नेटवर्क एक दिवसाच्या वर बंद असल्यास रिचार्ज ची मुदत(validity) वाढवून देण्यात यावी, ही प्रमुख मागणीही त्यांनी निवेदनात नमूद केली आहे. ह्यावर बि.एस.एन.एल मुख्य कार्यालय अकोला,काय निर्णय देईल याकडे सर्व जनतेचं व युवा वर्गाच लक्ष वेधलं आहे.